कारंजा (लाड) : कारंजा तालुक्यातीलच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक,गोंधळी लोककलावंत, निर्भिड व हाडाचे निःस्वार्थी पत्रकार आणि दिव्यांग जनसेवक प्रसिद्ध आणि गोरगरीब जनसामान्याचे आवडते व्यक्तिमत्व असलेल्या संजय मधुकरराव कडोळे यांच्या अभिष्ट चिंतनाचा सोहळा त्यांच्या मित्रमंडळींनी,शनिवार दि.27 जुलै 2024 रोजी सायंकाळी 06:00 वाजता,श्री कामाक्षा देवी संस्थान सभागृह, शहर पोलीस स्टेशन कारंजा (लाड) येथे त्यांच्या मित्रमंडळीनी आयोजीत केला आहे. दिव्यांग जनसेवक संजय कडोळे हे स्वतः अंत्यत हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करीत असून ते कौंटुबिक परिस्थितीने दुःखी आहेत. त्यांना कोणतेही कौटुंबिक आणि आर्थिक बळ नसून,अक्षरशः ते निराधार,भूमिहिन,बेघर आहेत. परंतु तरीदेखील ते गेल्या चाळीस वर्षापासून समाजाकरीता धडपडत आहेत.त्यांच्या ह्याच सेवाव्रती गुणाचा गौरव म्हणून कित्येक संस्था कडून त्यांना राष्ट्रीय,राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. शिवाय सन 2019 मध्ये महाराष्ट्र शासनाने, राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा हा सामाजिक न्याय विभागाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. तरी त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन,आदर्श जय भारत बहुउद्देशिय संस्था, ईरो फिल्मस एन्टरटेरमेंट,ईरो फिल्मस्,कारंजा पत्रकार मंच, विदर्भ लोककलावंत संघटना, करंजमहात्म्य परिवार,आई कामाक्षा मित्र मंडळ कारंजा यांनी केले असल्याचे माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया, प्रदिप वानखडे, उमेश अनासाने,डॉ इम्तियाज लुलानिया आदींनी केले आहे.