सामाजिक क्षेत्रात लोकोपयोगी कार्य करीत असलेल्या मान्यवरांना लोकमत समूहाच्या वतीने लोकमत चंद्रपूर भूषण २०२३ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्यातील मान्यवरांना गौरविण्यात आले. सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रतिष्ठेचा मानला जाणारा लोकमत चंद्रपूर भूषण २०२३ पुरस्काराने माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रघुनाथ चिमुरकर यांना देण्यात आला.
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर त्यांची नाळ गावातील मातीशी जुळलेली आहे. आपणही समाजाचे देणे लागतो, या उदात्त भावनेने गावखेड्यातील दीन,दलित, दुबळ्या, निराधारांना कुठल्याही कामासाठी आधार देण्याचे कार्य ते गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. समाजकारणाला राजकारणाची जोड देत गावखेड्याचा विकास कसा साधता येईल, यासाठी ते शासनस्तरावर नेहमी प्रयत्न करीत असल्याची त्यांच्या कार्यावरून प्रचिती येते. गावखेड्यातील दीन, दलित, दुबळ्या, निराधारांनी मदतीसाठी मागितलेल्या हाकेला त्यांनी नेहमीच साद दिली आहे. त्यामुळे ब्रम्हपुरी शहरातील नव्हेच तर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची नाळ त्यांच्याशी जुळलेली आहे. काळ्याकुट्ट ढगांनी सूर्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी स्वयंप्रकाशित हा तेजस्वी सूर्य इतर ग्रह, नक्षत्र, तार्यांना प्रकाश, ऊर्जा व प्रेरकशक्ती प्रदान करतो. त्याचप्रमाणे प्रमोदभाऊ चिमुरकर लोकसेवेचा वसा घेऊन सर्वसामान्य जनसमूहाला संजीवनी देण्याचे कार्य करत आहेत.
नेहमीच सामाजिक दायित्व जोपासत चांगले राजकारण व समाजकारण करीत असल्याच्या उद्दात्त कार्याने प्रेरित होऊन त्यांना लोकमत समूहाच्या वतीने लोकमत चंद्रपूर भूषण २०२३ देण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वेडेट्टीवार, प्रसिध्द सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, माजी आमदार परिनय फुके, अशोक बाबू जैन, संपादक श्रीकांत माने, नायक, विकास मिश्रा यांची उपस्थिती होती. सदर पुरस्कार वितरण सोहळा हॉटेल सेंटर पॉईंट पॅलिसीओ हॉल, रामदासपेठ नागपूर येथे पार पडला.
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रघुनाथ चिमुरकर यांना लोकमत समूहाच्या वतीने लोकमत चंद्रपूर भूषण २०२३ पुरस्कार देण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक केल्या जात आहे.