कारंजा (लाड) : कारंजा शहरात एका बापाने घरगुती वादातून आपल्याच मुलाची चाकू भोसकुन हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी बाप गोपाल मोखाडकर वय (६०) याला पोलिसांनी अटक केले असून त्याच्या विरुद्ध कारंजा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. प्राप्त माहितीनुसार काल रात्री दरम्यान कारंजा येथील रहिवासी गोपाल मोखाडकर आणि त्यांचा मुलगा अनिल यांच्या मध्ये घरगुती वाद झालं होतं.मात्र आज मृतक मुलगा अनिल मोखाडकर हा पुन्हा बापाशी वाद करत होता. या दोन्ही बाप लेकाच्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. व संतापाच्या भरात आरोपी बापाने मृतक अनिलच्या पोटात चाकू भोसकुन त्याचे पोटावर चाकुने तीन ते चार वार केले.आणि या मध्ये तो गंभीर जखमी होऊन जागेवरच निष्प्राण झाल्यामुळे त्याचा मृत्यु झाला. घटनेची माहिती कारंजा शहर पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी आरोपी बापाला ताब्यात घेतले असून कारंजा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.भरदिवसा एका बापानेच आपल्या मुलाची हत्या केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.