नागभिड: तालुक्यातील सावरगाव येथे "जागतिक जागतिक रक्तदाता दिनाच्या" निमित्ताने "स्वाब"नेचर केअर संस्था, वन विभाग,व तळोदी पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शासकीय रुग्णालयातील रक्त पेटी मध्ये असलेल्या रक्तांची कमतरता लक्षात घेऊन "स्वाब"नेचर केअर संस्थेने आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यावेळेस परिसरातील इच्छुक ५३ रक्तदात्यांनी यावेळेस रक्तदान केले. या मध्ये कविता कायरकर या महिलेने सुद्धा रक्तदान केले. यावेळेला संपूर्ण रक्त गटाचे रक्त रक्तदान करन्यात आले. यावेळेस रक्तदात्यांना केळी व ग्लुकोज, चहा,नास्ता देण्यात आला.संपूर्ण रक्तदात्यांना संस्था चे अध्यक्ष यश कायरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. हे रक्त संकलन करण्याकरितां गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयातील रक्तपेटी चमु आलेली होती. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मंडल, तथा वाढोणा ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी राहुल डोर्लीकर यांनी रिबीन कापून. केले. या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती सावरगाव येथील सरपंच रवीजी निकुरे, प्राध्यापक उत्तमजी मुंगमोडे, एस.बी. पेंदाम, नितेश शहारे वनरक्षक हे उपस्थित होते. रक्तदान शिबिरानंतर संपूर्ण रक्तदात्यांचे व रक्त पेटी समूहाचे आभार मानून "स्वाब" संस्थेचे सचिव अनिल लोनबले यांनी आभार प्रदर्शन केले.