शिक्षित आणि अल्पशिक्षित महिलांना लघू व विविध गृहउद्योगाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनवून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी बचत गट चळवळ सुरू झाली. बचतगटांच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्याबरोबरच रोजगार निर्मिती करुण महिलांचे आर्थिक सक्षमीकरण घडून येत आहे.महिला बचत गट ही केवळ योजना नसून महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाची एक सुप्त क्रांतिकारी चळवळ बनली आहे. बचत गटांमुळे महिलांमध्ये संघटनशक्ती, स्वविकास व सामाजिक विकासाची जाणीव निर्माण झाली. बदललेल्या व्यवसायांमुळे महिलांची आर्थिक स्तर उंचावण्यास निश्चित फायदा झाला आहे. असे प्रतिपादन आरमोरी विधानसभेचे आमदार रामदास मसराम यांनी केले
महिला आर्थिक विकास महामंडळ, गडचिरोली अंतर्गत ज्ञानदीप लोकसंचालित साधन केंद्र आरमोरी व महिला सक्षमीकरण समिती (VO) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटातील महिलांना फिरता निधी वितरित कार्यक्रम, कायदासाथी प्रशिक्षण तसेच अनुसूचित जमाती (ST) व अनुसूचित जाती (SC) महिला व मुलींसाठी मोटार व ड्रायव्हिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी आमदार मसराम अध्यक्षिय स्थानावरुण बोलत होते
त्या प्रसंगी उपस्थित: काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम,महिला व बालकल्याण सभापती मिनाक्षीताई गेडाम,महिला व बालविकास अधिकारी मडावी सहा. जिल्हा समन्वय अधिकारी देवतळे सर, साखरे मॅडम, रोशनीताई भैस मुक्तीपथ कोहचरे सर उपस्थित होते.
पुढे आमदार मसराम यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासोबतच कायदेशीर जाणीव आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यासाठी आपण पुढाकार घेणार असेही बोलले
यावेळी आमदार रामदास मसराम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास महिला बचत गटांच्या सदस्यांसह स्थानिक पदाधिकारी व मान्यवर महिला बचत गटाच्या सदस्यां मोठ्या संख्येने उपस्थित होते.