अकोला : सरस्वती नगर वाशिम बायपास स्थित खेंडकर ज्ञानगंगेमध्ये एक दिवसीय स्काऊट गाईड शिबिर कार्यक्रम संपन्न झाला. या शिबिरात सकाळच्या सत्रामध्ये ध्वजारोहण व देशभक्तीवर गीत स्पर्धेचे आयोजन इयत्ता ४ थी ते १० वी पर्यंत करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीत सादर करून विद्यार्थी व पालकांना मंत्रमुग्ध केले. दरम्यान यावेळी विविध खेळ स्पर्धमधे मेणबत्ती पेटविणे,, फुगे फुगवीणे, बटाटा शर्यत, नींबू चमचा आदी खेळ स्पर्धांचे आयोजन केले होते. दुपारच्या सत्रामध्ये शेकोटी कार्यक्रम राबविण्यात आला, मान्यवरांच्या हस्ते शेकोटी पेटविण्यात आली.

यावेळी विविध नाटीकांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये वर्ग चवथी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मुलगी शिकवा मुलगी वाचवा, हुंडाबळी, बाल मजुरी, पाण्याचे महत्व, व्यसन मुक्ती, भ्रष्टाचार, मराठी लोक गीत, हास्य जत्रा इत्यादी नाटीकाचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. स्काऊट विद्यार्थी हा नेहमी धैर्यवान, निष्ठावान असतो. स्काऊट नेहमी आपल्या सहकार्याला मदत करतो. एकमेका साहाय्य करू अवघे सुपंथ, हा संदेश देऊन आपल्या देशाच्या विकासाला हातभार लावावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.
स्काउटच्या नियमामुळे आपल्याला शिस्त शिकायला मिळते, नियम सर्वांसाठी असतात, त्याचे पालन सर्वांनी करणे म्हणजे शिस्तप्रीयता होय, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णुपंत खेंडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक निलेश खेंडकर तर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून स्व. यमुनाबाई खेंडकर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अल्केश खेंडकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले. यावेळी कार्यक्रमाचे संचालन उषा उबाळे यांनी केले, तर आभार गोपाल वानखडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्या साठी शाळेतील शिक्षक प्रज्ञानंद थोरात, श्रीकांत पागृत, सुरेश सुरत्ने, मिना घाटोळे, मनीषा अंभोरे, प्रशांत काळे, अश्विनी सोळंके, शितल तिवारी, अंजु मुंढे, यामीनी उपश्याम, उन्हाळे मॅडम, शारदा पांडे, कांचन तायडे, जया तेलगोटे, संचीता भालतीलक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी महिला व पालक वर्गांची फार मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.असे वृत्त आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....