ब्रम्हपुरी :--दिनांक १२/०६/२०२२ रोजी तालुक्यातील हळदा येथील मंजुर श्री, राजेंद्र अर्जुन कामडी वय अंदाजे ४८ वर्ष हे घराशेजारील (पटाची टोली) जंगलात कुंपणासाठी काट्या तोडण्यासाठी गेले असता वाघाने हल्ला करून ठार केले होते ही घटना ताजी असतांनाच आज दि 14/6/2022 रोजी एक दिवस आड होत नाही तर त्याच परिसरात आणखी एका शेतमजूर श्री देविददास परशराम कामडी वय 45 यांचा सकाळी 9.30 वाजता वाघाच्या हल्ल्यात बळी गेला त्यामुळे या परिसरातील जनते मध्ये दहशत निर्माण झाली असून सध्या शेतीचे हंगाम सुरू असल्याने शेती करायची कशी ही भीती निर्माण झाली असून सातत्याने या परिसरात वाघाच्या हल्ल्यात अनेक लोकांचे व पशुधनाचे बळी गेले व कित्येक जखमी झाले आहेत,परंतु वनविभाग या कडे सातत्याने दुर्लक्ष करून जनतेची दिशाभूल करीत आहेत त्यामुळे जनता आता वन विभाग अधिकाऱ्यानं वर विश्वास ठेवायला तयार नाही त्यामूळे आजची लोकांची मानसिकता बघता परिस्थिती आणखी चिघळत चालली होती आणि जो पर्यंत वरिष्ठ अधिकारी घटना स्थळी येऊन वाघ पकडण्याचे ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत मृत्यू देह उचलू देणार नाही अशी ताठर भूमिका जनतेनी घेतली होती.
नेहमी प्रमाणे देविदास परशराम कामडी व त्याच्या सोबत शिवराम फागो शहारे वय 65 वर्ष हे देविदास यांच्या शेतात सकाळी 9.30 वाजता शेती काम करण्या करता गेले असता ,शेताला लागून जंगलात दबा धरून बसलेल्या वाघांनी देविदास यांच्या वर अचानक हल्ला केला त्यावेळी त्याच्या सहकाऱ्यांनी आरडा ओरड केली असता त्यांच्यावर ही हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु याच्या हातात काठी असल्या कारणाने थोडक्यात बचावला,पण देविदास याचा मात्र वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला ही घटना गावात कळताच परिसरातील जनतेनी घटनास्थळी धाव घेतली .काही वेळानी वन विभागाचे व पोलीस विभागाचे अधिकारी आले असता गावकरी व अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली शेवटी उपवनसंरक्षक मा. मल्होत्रा यांच्या सूचनेनुसार सहाय्यक उपवनसंरक्षक मा.चोपडे व रेंज ऑफीसर शेंडे यांनी वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याचा व वाघांच्या हल्ल्यात ठार झालेल्या आणि जखमी झालेल्या कुटूंबाना मदत करण्याचा तसेच वाघाच्या गस्ती करिता जवळपास 100 मजुरांची एक वर्षा पासून ची रोजी आजतागायत दिली नाही ते पण देण्याचे मान्य केले तसेच नागरिकांच्या इतरही 22 सूचना वरिष्ठ स्तरावर पाठवून पाठपुरावा करण्याचे ग्राम पंचायत मध्ये झालेल्या मिटिंग मध्ये मान्य केले आहे.चर्चा करते वेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ विनोद झोडगे,माजी जिल्हा परिषद सदक्ष प्रमोद चिमुरकर, काँग्रेस चे नेते प्रभाकर सेलोकर,उपविभागीय अधिकारी शिंदे साहेब,माजी सरपंच राजेंद्र म्हस्के,माजी सरपंच ईश्वर झरकर,माजी उपसरपंच संजू लोणारे,कालिदास इटनकर ग्रा प सदक्ष ,धनराज लोणारे ग्रा प सदक्ष ज्ञानेश्वर झरकर, किसान सभेचे तालुका अध्यक्ष महेंद्र ज्ञानवडकर,बोडधा येथील उपसरपंच दीपक ठाकरे,भुज येथिल उपसरपंच सुरेश ठिकारे,धनराज ठाकरे,पत्रकार सचिन बदन,बंडू उरकुडे यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.
झालेल्या बैठकीत चर्चे नुसार येत्या 5 दिवसात निर्णय पूर्ण न झाल्यास या परिसरातील जनतेच्या वतीने वन विभाग कार्यालया ला ताला ठोको आंदोलन व पालकमंत्री यांच्या ब्रम्हपुरी येथील जण संपर्क कार्यालय समोर निदर्शने करण्याचा ईशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ विनोद झोडगे यांनी दिला आहे.