अकोला-- इंडीयन लॅंग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना या देशातील सर्व भाषिक वृत्तपत्रांच्या संपादक प्रकाशकांच्या राष्ट्रीय संघटनेच्या कार्यकारिणीची सभा आज दि.०५ एप्रिल २०२३ रोजी दिल्लीमध्ये संपन्न झाली.कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष,अकोला येथील दै.देशोन्नतीचे मुख्य संपादक श्री.प्रकाशभाऊ पोहरे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत वरिष्ठ उपाध्यक्ष,राज्यसभा सदस्य कोलकात्याच्या दै.सन्मार्गचे संपादक श्री विवेकजी गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रकाशभाऊ पोहरे व विवेकजी गुप्ता यांचे भावपूर्ण सत्कार करण्यात आले. निती आयोगाजवळील दिल्लीतील कॉन्स्टीट्यूशनल क्लबमध्ये झालेल्या या सभेत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.लवकरात लवकर सभासदांचे नुतनिकरण आणि नव्या सभासद नोंदणीचे काम व सर्व कामकाज सुरळीत सुरू करण्याचे तथा वार्षिक सर्वसाधारण सभा बेंगलोर येथे आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.यावेळी ईलनाचे माजी अध्यक्ष स्व. ललित श्रीमाल (उज्जैन,म.प्र)आणि स्व. रैनापूरकर ( महाराष्ट्र)यांचे निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
या सभेला अकोला येथून विश्वप्रभात संपादक व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व ईलना पदाधिकारी संजय एम.देशमुख,नागपूरचे संपादक शिवकुमार अग्रवाल,देवेन्द्रसिंह तोमर ( दिल्ली) दै.ताजा खबरचे रविकुमार बिष्णोई,अंकीत बिष्णोई ( मेरठ,राजस्थान), डॉ.संजय गुप्ता( दिल्ली) सौ.सरोजीनी आर्गे( कर्नाटक),संदिप कुमार गुप्ता( भोपाळ,म.प्र.)डॉ.अभिषेक वर्मा उपस्थित होते.