कारंजा (लाड) : शहरातील मध्यवस्तीतील मेन रोडवरील दिल्ली वेश दुरुस्तीच्या कामाकरीता पाडून ठेवण्यात आलेली आहे. परंतु गेल्या चार वर्षांपासून वेस दुरुस्तीचे काम संतगतीने सुरू असून मागील तीन वर्षांपासून निधी अभावी काम पूर्णपणे रखडले आहे. रखडलेल्या या कामाकडे लक्ष लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन नागरिकांना राहदरीस मार्ग उपलब्ध करुन द्यावा या मागणी करीता राष्ट्रवादी नेते मो.युसुफ पुंजानी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कारंजा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी वाशिम यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, कारंज्याच्या वैभवशाली चारही वेशी या ऐतिहासिक आहेत. अशा स्थितीत शहरातील पूर्व दिशेस दारव्हा वेस, पश्चिमेस पोहा वेस, उत्तरेस दिल्ली वेस, दक्षिणेस मंगरूळ वेस या ऐतिहासिक ठेवा असलेल्या वेशी शहराला लाभलेल्या आहे. काही काळाअगोदर या चारही वेशींची अवस्था शिकस्त झाल्यामुळे अत्यंत दयनीय होती. या चारही वेशीतून नागरिकांचे व वाहनांचे मोठ्या प्रमाणात आवागमन असल्यामुळे व काही वेशींच्या बाजूला नागरी वस्ती असल्यामुळे या शिकस्त वेशी कधीही कोसळून जीवित व वित्तीय हानीसुद्धा संभवत होती. इ.स.२०१२-१३ मध्ये यासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला. त्यातून मंगरूळ वेशीचे व पोहा वेशीचे काम पूर्ण झाले व ती नागरिकांच्या आवागमनास आता जनसेवेत रुजू झाली आहे. मात्र निधीअभावी दिल्ली वेशीचे काम रखडले आहे. दिल्ली वेस या मार्गाने जाणाऱ्या बहुसंख्य कॉलोनीतील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य मार्गावरील दिल्ली वेशीची इमारत पाडून आज जवळपास दोन वर्ष झालेले आहे. मात्र कोणतेही काम झालेले नाही, तसेच सदर इमारत पाडतांना मेनरोड वर रस्त्याच्या मध्यापर्यंत टिनाचा कठडा तयार केलेला आहे.त्यामुळे रस्त्याचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग हा व्यापला गेलेला आहे त्यामुळे त्याचा रस्त्यावरील वाहतुकीस नेहमीच अडथळा येतो व रस्त्यामध्ये नेहमीच नागरीकांमध्ये वादविवाद होऊन मारामारी पर्यंत प्रकरण जाते. तरी हा मार्ग त्वरित मोकळा करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करतांना मेहबूब शेख, ॲड. फिरोज शेकुवाले, माजी नगरसेवक सलीम गारवे,जाकिर शेख, चांद मुन्नीवाले, युसुफभाई ठेकेदार, सुनील आहूजा,जाहेद अली,अ.मोहसिन,अ.तालिब,अ. वहीद,जमील खान,सदिम नवाज,प्रमोद गायकवाड़,जलील खा, सलीम खान, इनामुर्राहेमान,हमजा भाई, नाजिम खान,राजीव भागवत, माजी नगरसेवक नितिन गढ़वाले, वासिमोद्दीन,अ.नईम,अ. आसिफ,उस्मान खान, माजी नगरसेवक इरशाद अली,शोएब खान,सलीम प्यारेवाले,रमजान बन्दूकवाले,अ.रशीद आदींची उपस्थिती होती.
आपल्या प्रतिक्रिया द्या....