कारंजा:- (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) कृषी विभागामार्फत, शेतकरी व शेतमजुरांच्या आणि ग्रामिण महिला बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि . 20 ऑगष्ट 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता, पंचायत समिती सभागृह कारंजा येथे,भव्य अशा रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी कारंजा पंचायत समिती सभापती प्रदीप बाप्पू देशमुख होते. तर उद्घाटक म्हणून कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्रजी पाटणी हे होते. उद्घाटन समारंभानंतर आ. राजेंद्र पाटणी यांनी नैसर्गीक रानभाजी स्टॉलला भेटी देऊन रान भाज्यांचे निरिक्षण करून, विक्रेत्यांचे मनोबल वाढवीले.आपल्या उद्घाटनपर संभाषणातून बोलतांना आ.राजेंद्र पाटणी यांनी रानभाज्यांचे आहारातील महत्व विशद करताना सांगितले की, "निरोगी शरीर ठेवण्या करीता भरपूर जिवनसत्व आणि औषधी गुणधर्मांनी युक्त असलेल्या सर्वच रानभाज्याचा आपण आपल्या आहारात वापर केलाच पाहीजे. दुदैवाने आजकाल रासायनिक खतांचा आणि औषधाचा वापर होत असल्यामुळे आहातामधून शरिराला पौष्टिक व जीवनसत्व युक्त भाज्या मिळत नाहीत.ही कमतरता केवळ नैसर्गिक रानभाज्याच दूर करू शकतात. परंतु आजकाल ह्या रानभाज्या सुद्धा दुर्मिळ होत चालल्या आहेत.त्यामुळे आपण आपल्या भूखंडावर निवासाचे बांधकाम करतांना,काही भाग परसबागे करीता राखीव ठेवून त्या अर्ध्या भूखंडामध्ये भाजीपाला, रानभाज्या आणि इतर फळ वृक्षांची लागवड करावी. जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला आपल्या आहाराकरीता रसायण विरहीत व विषमुक्त रानभाज्या,पालेभाज्या फळे मिळतील आणि त्यांचे आरोग्य निरोगी राहील,तसेच सध्या आपल्याकडे रानातील रानभाज्या ह्या भरपूर प्रमाणामध्ये आहेत.

त्याचा आपण सर्वांनी आपल्या आहारामध्ये जास्तित जास्त वापर केला पाहीजे."असे त्यांनी आवाहन केले.जिल्हा अधीक्षक अधिकारी आरिफ शहा यांनी आपल्या आहारातील रानभाज्यांचे महत्त्व विशद केले आणि आपण आपल्या रानभाज्या विसरून पिझ्झा बर्गरच्या मागे लागल्याने आरोग्य बिघडवून बसलो.त्यामुळे सर्व नागरिकांनी उपलब्ध रानभाज्याचे महत्त्व जाणून आपल्या आहारात रानभाज्यांचे विविध पदार्थ वापरून निरोगी रहावे. "असे त्यांनी आवाहन केले.उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी सांगितले की, "अशा रानभाजी महोत्सवाचा लाभ घ्यावा आणि रानभाज्यांची ओळख करून आपल्या आहारामध्ये विविध रानभाज्यांचा समावेश करावा तसेच प्रदर्शनांमध्ये आलेल्या स्टॉल वरील रानभाज्यांची खरेदी करून त्यांचा सुद्धा उत्साह वाढवावा." असे सर्व नागरिकांना आवाहन केले.

या कार्यक्रमामध्ये रविन्द्र जयाजी गायकवाड रा.गायवळ ता कारंजा जि.वाशिम यांना ना. धनंजय मुंढे कृषि मंत्री महाराष्ट्र यांचे हस्ते नुकताच स.वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान ,पुसद येथे कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कै वसंतरावजी नाईक गुण गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सर्व मान्यवराचे हस्ते सत्कार करण्यात आला.आणि रानभाज्याचे प्रदर्शन स्टॉल आणणाऱ्या बचत गटांचे संचालकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी उपस्थित सर्व गणमान्य मंडळींनी स्टॉल वरील रानभाज्याची पाहणी केली आणि माहिती जाणून घेतली. स्टॉल धारकांनी आणलेल्या रानभाज्या आणि इतर पदार्थ पाहून त्यांचे कौतुक केले आणि खरेदी करून त्यांचा उत्साह वाढवला. महत्वाचे म्हणजे याप्रसंगी गायवळ बचत गटाच्या महिलांनी प्रदर्शनी मध्ये मांडलेल्या गरमागरम अंबाडी भाकरी व ठेच्याच्या प्लेटची खरेदी करून जागेवरच गरमागरम अंबाडी भाकरीचा आस्वाद सुध्दा घेतला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे उपसभापती देवानंदजी देवळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा,उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसीलदार कुणालजी झाल्टे, गटविकास अधिकारी कारंजा प्रफुल तोटेवाळ,जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी संतोष चौधरी,तालुका कृषी अधिकारी रवींद्र जटाळे,भाजपा तालुका अध्यक्ष डॉ.राजीव काळे,भाजपा शहराध्यक्ष ललित कुमार चांडक, दिनेश भाऊ वाडेकर,शुभम बोनके,लहू चव्हाण,संकेत नाखले,राजीव भेंडे,गुड्डू पाटील कानकिरड,किशोर भाऊ ढाकुलकर,रत्नपाल तायडे, अक्षय देशमुख आणि गणमान्य व्यक्ती होते. रानभाजी महोत्सवाला पत्रकार संजय कडोळे,आरिफभाई पोपटे, भाजपाचे जिग्नेश लोढाया उपस्थित होते.तांत्रिक कृषी अधिकारी श्रीकृष्ण बेलखेडे,सर्व कृषी पर्यवेक्षक,सर्व कृषी सहाय्यक मंडल कृषी अधिकारी आणि कार्यालयीन कर्मचारी हजर होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविन्द्र जटाले तालुका कृषि अधिकारी कारंजा यांनी केले . सूत्रसंचालन गुणवंत ढोकने मंडळ कृषि अधिकारी कारंजा यांनी केले.तसेच या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी अतुल क्षीरसागर यांनी केले. असे वृत्त संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख यांनी कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....