२१ गावांमधे ओपन जिम साहित्य मंजूर.
ब्रम्हपुरी:
ब्रम्हपुरी तालुक्यातील २० खेडेगावांना जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा योजनेद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असल्याने व २१ खेडेगावांना व्यायामशाळा विकास योजना अंतर्गत ओपन जिम साहित्य मंजूरझाल्याने या गावांत आनंद व्यक्त केला जात आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातील खरबी, बेलगाव, भुज, बोडधा, चांदगाव, कहाली, चकबोथली, कुडेसावली, तुलानमेंढा, तोरगाव खुर्द, रामपुरी, पद्मापुर, कोसंबी, सायगाव, बेलपातळी, खरकाडा, पारडगावं, चांदली, नांदगाव, मुडझा या २० गावांची तहान आता भागणार आहे. तर पांचगाव, जुगनाळा, चौगान, सोनेगाव, रुई, रनमोचन, रानबोथली, गायडोंगरी, सायगावं, आक्सापुर, चांदगावं, दुधवाही, रामपुरी, वायगाव, भगवानपुर, गणेशपुर, भुज (तु), तुलानमेंढा, मांगली, चकबोथली, चिंचोली बु., या २१ गावांना व्यायामशाळा विकास योजना अंतर्गत ओपन जिम साहित्य मंजूर करण्यात आले आहे.
नाम. विजयभाऊ वडेट्टीवार, मंत्री बहुजन कल्याण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री यांनी पाणी योजनेसाठी तब्बल ९.७८ कोटी* रुपयांची तर ओपन जिम साहित्य साठी १.४७ कोटी* रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळवून दिल्याने या गावांत चैतन्य आहे. पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव करावी लागे. तर पावसाळ्यात गढूळ पाणी पिण्याची वेळ येते. या योजनेमुळे गावांना नळपाणीपुरवठा होणार आहे तर ओपन जिम मुळे ग्रामीण भागातील नागरिकांच आरोग्य निरोगी, सुदृढ ठेवण्यासाठी मदत होणार असल्याने आणि हे सर्व पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या भगीरथ प्रयत्नातून साकारत असल्याने लाभार्थी गावांत आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....