यंदाच्या दिवाळीत शेतकऱ्यांना मदत करून,सत्कर्माचे महापुण्य मिळवा. श्रीमंत आणि धनधांडग्यांनो,थोडी लाज वाटू द्या. 'तुमचा बाप जगाचा पोशिंदा बळीराजा.' घरातील होता नव्हता पैसा अदला,सोननाणं गमवून, कर्जबाजारी होऊन तुमच्यासाठी शेतात राब राब राबत असतांना,ओल्या दुष्काळाने पार बर्बाद होऊन कंगाल झाला.त्याच्या शेतात पाणीच पाणी होऊन, त्याच्या हाता तोडांशी आलेलं नगदी पिक गेलं.अतिवृष्टीने त्याला उत्पन्नापासून वंचित ठेवले.त्यामुळे त्याच्या समोर आता पुढे काय ? लोकांचे कर्ज कशाने फेडायचे ? जीथं पिकलचं नाही तीथं घरात काय खायचं ? असे नाना प्रश्न निर्माण झाले असून शासनाच्या कर्जमाफीच्या वेळकाढू धोरणाने तो नैराश्यात जात असून आत्महत्येसारखे वाईट विचार त्याच्या मनात येत आहेत. लक्षात ठेवा हा शेतकरी दुसरा तिसरा कुणी नसून तुमच्या साठी अन्नधान्य पिकवून तुम्हाला जगविणारा तुमचा बाप आहे. तुमचा पालनकर्ता आहे.त्यामुळे त्याला आज सरकार जसं कजमाफी पासून वंचित ठेवून वाऱ्यावर सोडतं आहे.तसं तुम्ही तरी वाऱ्यावर सोडू नका.आजच्या ओल्या दुष्काळात तुमची दिवाळी गेली खड्डयात. आधी ओल्या दुष्काळाची झळ बसलेल्या शेतकरी,शेतमजूर , ग्रामस्थ,दिव्यांग,निराधारांना आधार द्या. ग्रामिण भागातील प्रत्येक वस्ती,वाडे,तांडे ,गावखेडयात जावून त्यांना किराणा,धनधान्य,कपडे, ब्लँकेट व दिवाळीचे मिष्टान्न फराळ वाटून आधी त्यांना जगण्यासाठी मानसीक आधार द्या. व त्याला ह्या 'ओल्या दुष्काळाच्या' दलदली मधून बाहेर काढा.आज जगाचा पोशिंदा शेतकरी व शेतमजूर संकटात असतांना तुम्ही तुमचा स्वार्थ,तुमचा श्रीमंतीचा भपका आणि तुमचा अहंकार बाजूला सारून,हजारो,लाखो रुपयांचे फटाके फोडण्यापेक्षा, संकटग्रस्ताच्या मदतीला धावून गेलात. तर यासारखे दूसरे पुण्य कोणतेच होणार नाही.आज ओल्या दुष्काळाने,तुमच्यातील माणूसकी जागवून,तुम्हाला सेवाव्रती आणि निष्काम कर्मयोगी होण्याची संधी दिली आहे.तरी ह्या संधीचं सोनं करण्यासाठी समोवतालच्या शेतकरी,शेतमजूर व सभोवताच्या समाजासाठी तुम्ही आधारस्तंभ होवून हिमंतीने उभे रहा आणि नैराश्यात असलेल्या आजूबाजूच्या लोकांनाही ठामपणे उभे करा.तुम्ही यांच्या साठी चांगले कर्म कराल तर यांच्या आशिर्वादाने तुमची संपत्ती कमी होणार नसून दुप्पट चौपटीने वाढणारच आहे.शिवाय.सत्कर्म करण्याचे महापुण्य मिळणार हे महत्वाचे.*
दिपावलीच्या सणाला केन्द्र सरकार व राज्यसरकार हे आपल्या अधिकारी, कर्मचारी,नोकरदार,कामगार यांच्या महागाई भत्त्यात किंवा पगारात वाढ,त्यांना दिवाळी बोनस देत असते.परंतु तुम्हा आम्हाला जगविण्यासाठी,अन्न धान्य पिकविणारा,तुमचा बाप जगाचा पोशिंदा 'बळीराजा' व 'शेतमजूरांना' मात्र काय ? त्यांचा कुणी दिवाळीत विचार करणार काय ? त्यांना बसत नाही का महागाईची झळ ? त्यांना नसते काय दिवाळी ? त्यांच्या मुलांना नसते काय दिवाळीची हौस ? अरे तुमच्या साठी,तुमचा बाप जगाचा पोशिंदा शेतकरी हा ऊन-पाऊस-थंडीची तमा न बाळगता रात्री बेरात्री, कोणतीही संकटं विंचू काटका,किंवा हिंस्त्र पशू बिबटं,लांडगं,रोही, इत्यादीच्या सामोरे जातो किंवा चोर दरोडेखोरांशी दोन हाथ करुनच,आपल्या शेतातून मोठ्या कष्टाने अन्नधान्य पिकवीत असतो. परंतु त्याच्या आर्थिक परिस्थितीचा कधी विचारच केला जात नाही.त्यामुळे आता यापुढे कर्मचारी कामगारांप्रमाणे,सरकार कडून आणि समाजातून शेतकरी शेतमजूरांचाही दिवाळीत विचार व्हायला हवा ! आणि त्यांची दिवाळी देखील साजरी झाली पाहिजे. (-विनम्र : संजय कडोळे, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार) कारंजा (लाड) जि. वाशिम.)*
आपल्या प्रतिक्रिया द्या....