कारंजा/मानोरा : (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) सध्या पावसाळा संपून हिवाळा ऋतू सुरु झालेला असला तरीही निसर्ग राजाच्या लहरीपणा मुळे,बऱ्याच भागात आकाशात ढगाळ वातावरण दिसत आहे. या वातावरणामुळे थंडी अदृश्य झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तर सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याच कारणाने तिव्र स्वरूपाचे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असून 48 तासात, किनारपट्टीवर चक्रीवादळाचा फटक्या बसण्याची दाट शक्यता असून,त्याच्या परिणामाने,येत्या दोन तिन दिवसात महाराष्ट्राच्या काही भागात, ढगाच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, दरम्यान काही भागात गारपिट देखील होऊ शकते.त्यामुळे हवामानाचा अंदाज घेऊन शेतकर्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.