कारंजा [लाड] : लोकशाही मार्गाने,मतपत्रिकेद्वारे येत्या रविवारी दि.१६ एप्रिल रोजी, वाशिम जिल्ह्यातून,अखिल भारतिय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाकरीता,निवडणूक होऊ घातलेली असून,खरे तर नाट्य परिषदेच्या कारंजा शाखेच्या उज्वल भवितव्याकरीता ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे.त्याचे कारण म्हणजे गेल्या जवळ जवळ ३०-३५ वर्षापासून,कारंजा नगरीत नाट्य परिषद शाखा असतांनाही, कारंजा शाखेला आजता गायत, कार्यालयाकरीता स्वतःच्या हक्काची जागा किंवा स्वतःच्या मालकीचे सभागृहच (व्यासपिठ)मिळालेले नाही.शिवाय गेल्या कित्येक वर्षात कारंजा शाखेकडून उल्लेखनिय अशी कामगीरी म्हणजेच नाट्य संमेलन,नाटकाचे प्रयोग किंवा नाट्यस्पर्धा झालेल्याच नाहीत.नाट्य कलावंताच्या प्रशिक्षणाची कोणतीच व्यवस्था नाही.मराठी नाट्य परिषद आजिवन सभासदाची नोंदणी झालेली नाही.तसेच महत्वाचे म्हणजे नाट्य कलावंताना रोजीरोटी मिळू शकेल.निदान वयोवृद्ध कलाकारांना निवृत्ती वेतन मिळेल असे कार्य सुद्धा शाखेकडून झालेलेच नाही.त्यामुळे प्रस्थापिता विरुद्ध अनेक नाट्य कलावंताचे मनात खदखद आहे. अशातच नाट्य परिषद निवडणूका सुरु झाल्यात.
सदर्हू निवडणूकीतिल मागील नियामक मंडळ सदस्यांना कोविड १९ कोरोना महामारी काळात देशात, शासनाकडूनच सक्तीने संचारबंदी (लॉकडाऊन) असल्याकारणाने विकासाची कोणतीही कामे करता आलेली नाहीत.खरेतर हे कटूसत्य आहे. परंतु आगामी काळात आपल्याला अ भा मराठी नाट्य परिषद कारंजा शाखेच्या व जिल्ह्यातील इतरही शाखेच्या सर्वच सन्माननिय पदाधिकारी व आजिवन सदस्यांना विश्वासात घेऊन,फक्त आणि फक्त कारंजा, मानोरा,मंगरूळपिर,रिसोड,मालेगाव,वाशिम,मुर्तिजापूर येथील नाट्यक्षेत्राची जास्तित जास्त भरभराट म्हणजेच विकास कसा करता येईल व कित्येक दिवसांपासून अंधारात खितपत असलेल्या वयोवृध्द, दिव्यांग, आजारग्रस्त व महिला महिला कलावंताना जास्तित जास्त आर्थिक मदत कशी करता येईल. त्यांना लवकरात लवकर पेन्शन कसे सुरु करता येईल याकडेच आमचा भर राहणार असल्याची स्पष्टोक्ती निवडणूकीत ( मतपत्रिकेवरील ) पहिल्या क्रमांकाचे उमेद्वार कव्हळकर नंदकिशोर अंबादास व चौथ्या क्रमांकाचे उमेदवार देशमुख उज्वल दत्तात्रय यांनी दिली आहे. आमच्या प्रतिनिधीने अ भा मराठी नाट्य परिषदेच्या शाखा असलेल्या प्रत्येक गावी मतदाराचा कौल जाणून घेण्याकरीता फेरफटका मारला असता नंदकिशोर अंबादास कव्हळकर व उज्वल दत्तात्रय देशमुख याची बाजू १००% मजबूत असल्याचे दिसून आले. नंदकिशोर कव्हळकर व उज्वल देशमुख यांनी आपल्याच मतदाराची किंवा कलावंताची केव्हाच फसवणूक केलेली नाही. किंवा कलावंत महिला मंडळीना दरमहा मानधन मिळवून देण्याचे खोटे आश्वासन दिले नाही. किंवा खोटे आमिष दाखविण्याची लबाडी केलेली नाही. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात भजनी महिला मतदार व नाट्य कलावंताचा त्यांनाच पहिल्या पसंतीचे मतदान देण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी ठासून सांगीतले. शिवाय नाट्यकलावंतानी सांगीतले की, श्री नटराज नटेश्वरासह आमचे आराध्य दैवत गुरुमाऊली श्री नृसिह सरस्वती स्वामी असून, त्यांच्याच चरणी नतमस्तक होऊन,आपल्या प्रचाराचे नारळ फोडणाऱ्या नंदकिशोर कव्हळकर तथा उज्वल देशमुख यांना प्रत्यक्ष गुरुमाऊली श्री नृसिह सरस्वती स्वामी यांचे आशिर्वाद प्राप्त झाल्यामुळे हे दोन्ही उमेद्वार निवडणूक जिंकणारच हा आमचा अतूट विश्वास आहे. व श्री गुरुमाऊली समोर नाट्यकलावंताना न्यायहक्क मिळवून, नाट्यसभागृहाचे व कलावंताच्या मानधन योजनेचे वचन हे दोन्ही उमेदवार खात्रीने पूर्ण करतीलच.प्राण गेला तरी बेहत्तर पण वचन मोडणार नाही अशा बाण्याचे नंदकिशोर कव्हळकर व उज्वल देशमुख असल्याचे कारंजा-मानोरा-वाशिम येथील नाट्य कलावंतानी स्पष्ट केले आहे.