ब्रम्हपुरी :- विदर्भातील शिक्षणाची नगरी म्हणुन ओळखले जाणारे शहर म्हणजेच ब्रम्हपुरी, येथील नेवाजाबई हितकारणी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत नव्या सेवकांनी स्वच्छतेचे धडे घेत महाविद्यालयीन प्रांगणात स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले.
सर्वत्र गाव,शहर, वॉर्ड, वस्ती मध्ये आजच्या घडीला घाणीचे साम्राज्य असल्यामुळे स्वच्छ्ता कमी आढळुन येत आहे. स्वतःला किंवा स्वतःच्या घरामर्यादित स्वच्छ्ता ठेवणेच पुरेसा नाही तर गाव, शहर, वॉर्ड, वस्तीतील रस्ते, नाल्या, प्रांगण, शाळा, महाविद्यालये इत्यादी सर्व ठिकाण स्वच्छ असणे, मानव जातीलाच नाही तर सृष्ठीवरील सर्व सजीवांसाठी आवश्यक आहे.
उद्या ला स्वातंत्र्य दिवस आहे, हे लक्षात घेत राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रकाश वट्टी यांनी स्वच्छ्ता हि आपल्या प्रथम कार्याची सुरुवात असुन मातीच्या सुगंधाची उजळन वाढावी. समाजात स्वच्छ असलेले प्रांगण हे आकर्षक असतात, तर त्या प्रांगणाचा विविध खेळांमध्ये अथवा कार्यक्रमांसाठी उपयोग होतो.
व्यक्ती लहान असो किंवा मोठा, प्रत्येक वयात स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक असते. जसे जेवणाच्या आधी हात धुणे, दररोज अंघोळ करणे, दातांची स्वच्छता ठेवणे, खाली तसेच उघळ्यावर पडलेल्या वस्तू न खाणे, घराला स्वच्छ ठेवणे, घरात सूर्यप्रकाश तसेच हवा खेळती राहू देणे, वाढलेली नखे कापणे आणि स्वच्छ करणे, घरच नाही तर आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ ठेवणे, शाळा कॉलेज इ. सार्वजनिक स्थानावर कचरा न फेकणे इत्यादी गोष्टी स्वच्छतेसाठी आवश्यक आहेत. नेहमी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवावा. या सारख्या अनेक गोष्टी आहेत ज्यांचे पालन करून आपण आपली स्वच्छता ठेवू शकतो.
स्वच्छतेचे भरपूर फायदे आहेत जसे स्वच्छतेची सवय आपल्याला खूप साऱ्या रोगांपासून संरक्षित ठेवते. कोणताही रोग शरीराला अपायकारक तर असतोच पण या सोबत दवाखान्याचा खर्च देखील वाढवतो. खराब पाणी आणि अन्न खाल्याने पिलिया, टायफॉइड, कॉलेरा सारखे रोग होतात. जास्त वेळ पडलेल्या खराब पाण्यात डास वाढायला लागतात. जे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या रोगांना आमत्रण देतात.
व्यर्थ रोगांना वाढवण्या पेक्षा चांगले आहे की आपण स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे व स्वच्छतेचे नियम पाळायला हवेत. व्यक्तिगत स्वच्छता सोबत वैचारिक स्वच्छता पण खूप महत्त्वाची आहे. विचारांची स्वच्छता असेल तर आपण एक चांगले व्यक्ती बनतो. असा व्यक्ती स्वतःच्या विकासासोबत समाजाचा सुद्धा विकास करतो.असे मार्मिक मार्गदर्शन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या नव्या सेवकांना केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....