स्थानिक बालाजी परिवार चॉस्टेबल अॅन्ड वेलफेअर ट्रस्ट कारंजा तथा बालाजी नगर भाग 2, बायपास कारंजा परिसरातील राहिवाशांच्या वतीने, दिव्य व अद्भुत असे श्री साईबाबा वाटिका मंदिराचे निर्माण कार्य करण्यात येणार असून सदरहू मंदिराच्या निर्माणा करीता आंतरराष्ट्रिय ख्यातीच्या कवींचे "हास्य कवी संमेलन" रविवार दि . 29 मे 2022 रोजी रात्री 06:30 ते रात्री 10:00 वाजेपर्यंत, स्थानिक देशमुख मंगलम् मुर्तिजापूर रोड, कारंजा येथे ठेवण्यात आले असून, श्री साईबाबा मंदिर निर्माणाच्या आर्थिक मदतीकरीता हा हास्यकवि संमेलनाचा आगळा वेगळा प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेला मिळाली असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले असून, कविसंमेलनात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कवी घनश्याम अग्रवाल [ राजस्थान ], , राजेन्द्र मालवीय [ भोपाळ ], गानकोकीळा : माधुरी किरण [बालाघाट ], मनिष वाजपेयी [ मुंबई ], ज्युनिअर जॉनी लिव्हर [ अभिनेते ], किरणजी जोशी [ सब टि व्ही अभिनेते ] सहभागी होणार असल्यामुळे, कारंजा नगरीतील साहित्य व कलारसिकांकरीता ही फार मोठी मेजवानी ठरणार आहे . तरी सदर्हु कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे .