कारंजा: दिनांक 10 मार्च 2024 रोजी भूमिपूजन प्रसंगी बोलतांनी ज्ञायकभाऊ पाटणी यांनी सांगितले की,आमदार पाटणी साहेबांनी सर्वांसी संपर्क ठेवला आपलाही सर्वांसी संपर्क राहील. साहेबांचा मोबाईल नंबर कायम आहे. साहेबांच्या माघारी आता जबाबदारी वाढली आहे. चांगले काम करायचे आहे. साहेबांचे स्वप्न पुर्ण करायचे आहे, त्यांचे काम पुढे न्यायचे आहे.तालुक्यातील पोहा, वढवी, लोहरा, बेलमंडळ, किनखेड येथील आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी बोलतांनी त्यांनी सांगितले. उपरोक्त गावी 10 कोटी 12 लक्ष कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.तसेच रामनगर येथील धार्मिक कार्यक्रमास भेट दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष डॉक्टर राजीव काळे होते.
कार्यक्रमात वेगवेगळया ठिकाणी ज्ञायकभाऊ पाटणी यांच्या सोबत डॉ राजीव काळे, अनिल कानकिरड, राजीव भेंडे , रामकिसन चव्हान, संकेत नाखले,दिनेश वाडेकर, जिल्हा परिषद सदस्य अशोक भाऊ चव्हान, मंगेश धाने, अमोल गढवाले, सविज जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पोहा येथे दुर्गा देवी मंदीर संस्थान पोहा तालुका कारंजा येथे डोम शेड सभागृह बांधकाम करणे अंदाजित किंमत 30 लक्ष रुपये,
वाशिम जिल्ह्यातील लोहारा पोहा पारवा काकडशिवणी भडशिवणी बांबर्डा कूपटी लहान पुलाचे बांधकाम करणे 150.00 लक्ष ,वाशिम जिल्ह्यातील लोहारा पोहा पारवा काकडशिवणी भडशिवणी बांबर्डा कुपटी रस्त्याचे बांधकाम करणे 764.00 लक्ष ता. कारंजा जिल्हा वाशीम या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.
यावेळी सर्वश्री सरपंच सौ शितलताई मसने,अशोक पाटील दहातोंडे दुर्गा देवी संस्थानचे अध्यक्ष, अशोक आप्पा पूनेवार , जिल्हा परिषद सदस्य आशिष पाटिल दहातोंडे, संजय पुणेवार, गजानन ढोकणे, भुजंगराव वाळके साहेब,सुनिल मसने, कुलदीप अवताडे, रमेश पवार,संतोषी कवळे, सौ. चव्हाण, केशव जाधव, कुलदीप अवताडे, डॉ. राजीव काळे, राजु राठोड, दिलिप राऊळ इत्यादी सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रामनगर येथे येथील धार्मिक कार्यक्रमासाठी ज्ञायक भाऊ पाटणी यांनी भेट दिली. येथे त्यांचा व डॉ राजीव काळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. येथील कार्यक्रमात हरिबाबा मंदिर परिसरात सभामंडप करीता 20 लक्ष रुपयांची नुकतीच मंजूरात आमदार निधीतून झाल्याची माहिती ज्ञायकभाऊ पाटणी यांनी दिली. यावेळी अमर सिंग नाईक, संजय चव्हाण, विष्णू भाऊ, सूर्यकांत जाधव, प्रा. भाऊराव पवार, डॉ राजीव काळे, डी टी राठोड, मनोहर पवार, ग्राम पंचायत सदस्य, ग्राम पंचायत सरपंच, प्रवीण राठोड सरपंच कामठवाडा,वढवी येथे जगदंबा मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे 10लक्ष रुपये ,दलीत वस्ती रस्त्यांचे बांधकाम करणे 10 लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले . यावेळी सरपंच सौ पुष्पा सिध्दार्थ इंगोले, ग्राम पंचायत सदस्य ज्ञानदेव गोविंदराव कदम , श्रीकृष्ण सहदेव राव लेहार कर, बाळु रामकृष्ण महाजन, विजय सुखदेव राव वनारसे, गजानन लसनकुटे, रमेश लसणकुटे इत्यादी मान्यवर, गावकरी उपस्थित होते.लोहारा -येथे लोहारा ते धाकली अंदाजित किंमत 2 लक्ष पाणंद रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी रामकिसन चव्हान,रामराव राठोड ,किशोर राठोड, गजानन बासुळे,गणेश रसाळे ,राजू पवार ,मुकिंदा सोनवणे, जगन्नाथ बानोले ,राजू कुटे ,मनोज रसाळे ,राहुल ठाणे ,अशोक पवार ,राजेंद्र देशमुख इत्यादि सह गावातील नागरिक उपस्थीत होते.बेलमंडळ येथे महादेव मंदीर परीसरात सभामंडप बांधकाम करणे 2515 अंतर्गत 10 लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी राजेंद्र पाटील घुले, रवी पाटील घुले, अजय होलगरे, बाळू शिंदे, बाबाराव काळे, उकंडा लवंगे, यादवराव, सुखदेव एकनार, विनोद काळे इत्यादीसह गावकरी मंडळी उपस्थित होते . किनखेड येथे हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे अंदाजित किंमत 10 लक्ष रूपये,वाशिम जिल्ह्यातील किनखेड पोच मार्गाचे रुंदीकरणासह सुधारणा करणे अंदाजित किंमत 26.00 लक्ष या कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.
यावेळी सरपंच नीलकंठ सोनोने, उपसरपंच रवी घुगे , मनोहर दराडे, अंकत दराडे, प्रमोद तोंडे, विनोद दराडे ईत्यादि सह गावातील नागरिक उपस्थित होते.गावातील मान्यवरांनी व्यासपीठावरील उपस्थित यांचा सत्कार केला. कार्यक्रमास गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिद्ध प्रमुख यांनी कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....