कारंजा (लाड) : माणसाची निती किंवा उद्देश चांगला असला तर प्रत्यक्ष परमेश्वर त्याच्या मदतीला धावून येतो.याचा प्रत्यय रविवारी झालेल्या नाट्य परिषद नियामक मंडळ निवडणूकीच्या वेळी अनुभवास मिळाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कारंजा येथील नंदकिशोर अंबादास कव्हळकर हे कारंजा शहरातील प्रामाणिक,सत्यवचनी,विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांचा स्थानिक कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती बाजारपेठे मध्ये अडतचा व्यवसाय असून,ते मनभा येथील परमहंस श्री नागाबाबा संस्थानचे विश्वस्त सचिव सुद्धा आहेत. शिवाय विदर्भ लोककलावंत संघटनेचे सदस्य, अखिल भारतिय मराठी नाट्य परिषदचे आजिवन सदस्य आहेत.सध्या वाशिम जिल्ह्यात अ. भा. मराठी नाट्य परिषद निवडणूक प्रक्रिया सुरु असल्यामुळे ते आपल्या मित्रमंडळीसह टिळक चौक स्थित, विश्वप्रयाग कॉम्प्युर्ट्स, रेणुका लॉन कारंजा येथील मतदान केन्द्रावर असतांना, अचानक वृंदावन येथील,नागा साधुंची गाडी त्यांचे टेन्टजवळ येऊन थांबली आणि त्यामधून नागा साधुंनी खाली उतरून, नंदकिशोर कव्हळकर यांना दर्शन देऊन, "बच्चा तू राजयोगी है । आज तेरी जोभी इच्छा आकांक्षा होगी वह पूरी होगी । आज तू चुनाव के अंदर १०१ प्रतिशत जीत कर रहेंगा ।" असा स्वतःहून शुभाशीर्वाद दिला. या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार, नगर परिषद प्राथ.शाळेचे माजी मुख्याध्यापक रविन्द्र नंदाने गुरुजी तथा डॉ . इम्तियाज लुलानिया, पत्रकार विजय खंडार इत्यादी तेथे उपस्थित होते. व सायंकाळी मतमोजणी अखेर नागाबाबांची भविष्यवाणी खरी ठरल्याची अनुभूती नंदकिशोर कव्हळकर यांचेसह उपस्थितांना अनुभवास मिळाल्याची चर्चा कारंजा शहरात सुरु आहे.याबाबत नंदकिशोर कव्हळकर यांना विचारले असता, ते म्हणाले मी मनभा येथील परमहंस नागाबाबा यांचा भक्त आहे. त्यामुळे कारंजा शहरात केव्हाही न पाहीलेले नागा साधू जेव्हा अचानक स्वतःहून माझ्याजवळ आले तेव्हा नागाबाबा यांना तर मी डोळ्यानी पाहिलेले नाही परंतु तेच माझ्या मदतीला धावून आल्याची खात्री मला झाली असल्याचे त्यांनी सांगीतले.