कारंजा-दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी येथे अनोख्या पद्धतीने वृक्ष रक्षणाची शपथ घेऊन वृक्ष-रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
वृक्ष संवर्धन निमित्त जनजागृती व्हावी व वृक्ष आपल्याला कशा प्रकारे रक्षकाचे कार्य पार पडतात या हेतू पुर्तीसाठी शाळेत वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन हा उत्सव संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी वर्ग 8,9,10 व्या वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला. विद्यालयातील परिसरात सर्व वृक्षांना राख्या बांधल्या,तसेच त्यांचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले त्यातून प्रथम व द्वितीय असे क्रमांक काढण्यात आले.
या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिक विजय भड, हरित सेना प्रभारी शिक्षक राजेश शेंडेकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्म उपस्थित होते, कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विद्यार्थ्यांचे मोलाच सहकार्य लाभले.