सिंदेवाही - सिंदेवाही शहरात व तालुक्यात अनेक वर्षांपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. जयंतीनिमित्त शहरातील शिवाजी चौक येथे महाप्रसाद ( आलूभात ) वितरण करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून नागराज गेडाम ,भोजराज सोरते अरविंद जैस्वाल ,गोपीचंद गणवीर, नंदू भाऊ खोब्रागडे, प्रशांत खोब्रागडे, मेश्राम सर या वेळेस उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त उपस्थितांनी मार्गदर्शन पर भाषण केले. या कार्यक्रमाला उपस्थित गणेशभाऊ मेश्राम ,मनोज भाऊ सुखदेवे ,संजुभाऊ शेंडे ,नितीन लोखंडे ,युवराजभाऊ वाकडे, सोनू सोरते तसेच गणेशभाऊ मेश्राम यांचे मित्र मंडळ इत्यादीनी अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी केला.