कारंजा : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१४ मध्ये तृतियपंथीयासाठी खास आदेश पारीत करण्यात आला होता. व त्यानुसार सरकारने न्यायालयाच्या आदेशानुसार तृतियपंथीयासाठी प्रत्येक जिल्हयात तृतियपंथी कल्याणकारी महामंडळाची स्थापना त्वरीत करून त्याद्वारे तृतियपंथीयाच्या हिताच्या विविध योजना सुरु केल्या व त्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर याची अंमलबजावणी करण्याच्या सुचना सुध्दा दिल्या होत्या. तृतीयपथींच्या हक्काचे रक्षण करणारा कायदा २०१९ नुसार वेळोवेळी या संदर्भात कायद्याने संसदेने केलेल्या विनीयोजनानंतर केंद्र सरकार वेळोवेळी परिषदेकडे कायद्यातील हेतू पुर्ण करण्यासाठी आवश्यक रक्कम जमा करेल. असे शासनाने ठरवले होते . परंतु तरी देखील यवतमाळ वाशिम मतदार संघामध्ये तृतियपंथीयाकरीता वाशिम जिल्हयात तृतियपंथी कल्याणकारी महामंडळाची स्थापना झाली नसल्याचे शल्य कारंजा येथील तृतियपंथी श्रावणी हिंगलाजपूरे यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे सचिव विजय पाटील खंडार यांचेकडे मुलाखती दरम्यान प्रगट केले आहे . याबाबत अधिक बोलतांना त्यांनी सांगीतले की तृतियपंथी कल्याणकारी महामंडळाची स्थापना शासनाने लवकरात लवकर करावी म्हणून माझी मागणी पालकमंत्री ना संजयभाऊ राठोड यांनी आयोजीत केलेल्या समाधान शिबीराकरीता मी दि . ७ नोहेंबर रोजी सादर केलेली आहे. व मला अपेक्षा आहे की, समाधान शिबीरात माझ्या मागणीचा मंत्री महोदय विचार करून आम्हा तृतियपंथीयांच्या हिताकरीता तृतियपंथी कल्याणकारी महामंडळाच्या स्थापने करीता अनुकूलता दर्शवतील आणि आम्हा तृतियपंथियांना सन्मानाची वागणूक मिळवून देण्याकरीता शासकिय अधिकारी पदाधिकारी यांना निर्देश देतील. तसेच आम्हाला शिधापत्रिका उपलब्ध करून देऊन दरमहा मानधन किंवा अर्थसहाय्य मिळवून देऊन सन्मानाची वागणूक देतील असा विश्वास कारंजा येथील श्रावणी मधुकर हिंगासपुरे यांनी या वेळी व्यक्त केली. असे वृत्त विजय पाटील खंडार यांनी कळविले आहे .