वाशिम : महायुतीला एक हाथी सत्ता मिळाल्यामुळे पुन्हा एकदा महायुती सरकार नव्याने स्थापन होऊन ना.देवेन्द्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले असून लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होऊ घातलेला आहे.त्यामुळे सलग विस बावीस वर्षाच्या कालखंडानंतर यंदाच्या मंत्रीमंडळात तरी ना.देवेन्द्र फडणवीस यांच्या सरकारने वाशिम जिल्ह्यातील कोणत्याही आजी माजी विधानपरिषद किंवा विधानसभा आमदाराचा मंत्रीमंडळात समावेश करून पालकमंत्री पदाची धुरा जिल्ह्यातील रहिवाशी असणाऱ्या आमच्या हक्काच्या स्थानिक आमदाराकडेच सुपूर्द करण्याची आग्रही मागणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाजसेवक तथा विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी निवेदनाद्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,पक्षाध्यक्ष अमित शहा,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री ना.देवेन्द्र फडणवीस यांना केली आहे.याबाबत अधिक वृत्त असे की,दि.26 जानेवारी 1998 रोजी स्थापन झालेला नवनिर्वाचित वाशिम जिल्हा हा नाविन जिल्हा आहे.पूर्वी वाशिम लोकसभा मतदार संघ हा स्वतंत्र लोकसभा मतदार संघ होता. तसेच मतदार संघात वाशीम, मंगरुळपिर,मालेगाव-रिसोड आणि कारंजा अशी एकूण चार विधानसभा मतदार संघ होते. परंतु गेल्या काही वर्षापूर्वी झालेल्या मतदार संघ पुनर्रचनेत वाशिम लोकसभा मतदार संघ हा यवतमाळ लोकसभा मतदार संघाशी जोडल्या गेला तर चार पैकी एक विधानसभा मतदार संघ कमी करण्यात आला. त्यामुळे आधीपासूनच मागासलेला असलेला हा वाशिम जिल्हा विकासापासून संपूर्णतः दुर्लक्षित राहीलेला असून, जिल्ह्यातील वाशिम वगळता सर्वच तालुके हे कृषी विकास, उच्चशिक्षण,आरोग्य सुविधा,औद्योगीक वसाहती, उद्योगकारखाने,रोजगार निर्मिती,जलसिंचन,तिर्थक्षेत्र व पर्यटन विकासापासून पूर्णतः वंचित राहीलेले असून जिल्ह्याच्या सुशिक्षित बेरोजगार आणि मजूर कामगारांना आपल्या व कुटूंबियांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई,पुणे किंवा गुजरातकडे धाव घ्यावी लागते.किंवा उपासमारीला तोंड द्यावे लागते.विशेष म्हणजे जिल्ह्यात दिग्गज राजकिय नेते असतांनाही,गेल्या वीस बावीस वर्षापासून जिल्ह्यातील आमदाराचा समावेश मंत्रीमंडळात होत नसल्यामुळे जिल्ह्याला स्थानिकचे आमदार हे आपल्या हक्काचे पालकमंत्री म्हणून मिळू शकत नसल्यामुळे जिल्ह्यातील विकासाला चालना मिळत नाही.त्यामुळे वाशिम जिल्हा हा निर्मिती होऊनही आज रोजी जवळ जवळ वीस बावीस वर्षापासून परजिल्ह्यातील पाहुण्या मंत्र्याच्या पालकत्वाखाली येत असल्याने विकासापासून वंचितच रहात आहे.दुदैवाने जिल्ह्याला हक्काचा स्थानिक पालकमंत्री मिळत नाही.ही जिल्ह्याच्या विकासाला अडथडे आणणारी बाब हेरून जिल्ह्यातील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाजसेवक तथा विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी वाशिम जिल्ह्यातील स्थानिक विधानपरिषद किंवा विधानसभेच्या आजी माजी आमदारांपैकी कुणाही व्यक्तीचा मंत्रीमंडळात समावेश करून पालकमंत्री करण्याची आग्रही मागणी लावून धरली आहे.