कारंजा : आपल्या सेवेच्या संपूर्ण कार्यकाळा मध्ये,विद्यार्थ्यांवर शिक्षणा सोबतच पितृत्वाच्या भावनेतून सुसंस्कार घडविण्या-सोबतच कधी प्रेमाने तर कधी कठोर शिक्षा देऊन,हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवून त्यांना त्यांच्या स्वपावलांवर उभे करून, "आदर्श गुरुवर्याच्या" पद प्राप्तीच्या उच्च शिखरावर पोहोचलेले,रविन्द्र नंदाने गुरुजी यांनी नोकरी व्यवसाय सांभाळून,सांस्कृतिक कलेचा व्यासंग जपलेला होता. आपल्या सभोवती बाहेर त्यांनी मित्रमंडळींचे फार मोठे वलय निर्माण केलेले होते व त्यातूनच, अष्टविनायक कल्चरल ग्रुप द्वारे नाट्यकला जोपासून, कारंजेकरांना अनेकानेक नाट्यकलावंत सुद्धा दिले आणि अनेक राज्यपातळीवरील नाटय चढाओढी व एकांकी स्पर्धेमधून पारितोषिके मिळवून, कारंजेकरांच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता.त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना नटवर्य म्हटले तर वावगे ठरू नये एवढे निश्चितच.आज सेवानिवृत्ती नंतरही त्यांचा शिक्षणाचा व कलेचा व्यासंग कमी झालेला नाही.
त्यामुळे वृद्धापकाळी सुद्धा नाट्यकले करीता चाललेली त्यांची धडपड पहाता,महाराष्ट्र शासनाने त्यांची निवड "मराठी रंगभूमि परिनिरिक्षण मंडळ मुंबई" (अर्थात सेन्सार बोर्ड)या समितीवर केलेली आहे.अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या रविन्द्र नंदाने गुरुजी यांना अष्टविनायक कल्चरल ग्रुप आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना सत्कार करण्यात आला.
तसेच त्यांना शुभेच्छा देण्याकरीता संगीतधारा कार्यक्रम घेण्यात आला असता अनेक कलावंतांनी अप्रतिम रचना सादर केल्यात.याप्रसंगी प्रकाशदादा राऊत,संगीताचार्य देवलाल बोर्डे गुरूजी,नंदकिशोर कव्हळकर,भटकर गुरुजी,कचरे गुरुजी,संजय कडोळे,अश्विन जगताप,चव्हाण,शारदाताई भोयर,कामाक्षाताई सोने, गायकवाड मॅडम,नंदाने ताई, कचरे ताई आदी कलावंताची उपस्थिती होती.