वाशिम : प्रजासत्ताक भारत देशात प्रजेचे लोकशाही सरकार आहे.त्यामुळे मतदान करणे हा प्रत्येक नागरीकांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदारांनी मतदान करणे अत्यावश्यक आहे.याची जाणीव प्रत्येक मतदारांना करून देण्याकरीता जिल्हाधिकारी बुवनेश्वरी मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा परिषद प्राथ शाळा ब्राम्हणवाडा येथील शिक्षक किशोर शामराम कांबळे गुरुजी आणि जिल्हा परिषद प्राथ शाळा तामसी येथील शिक्षक रामेश्वर पंचांगे गुरुजी यांनी मागील वर्षी 2024 मध्ये लोकसभा मतदान जनजागृतीची चित्रफित किंवा रिल्स (टेलिफिल्म) बनवीली होती.
सदरहु रिल्समध्ये नायिकेची प्रमुख भूमिका वठविलेल्या विद्यार्थिनी कु. अमृता रामेश्वर पचांगे हिची भूमीका महत्वाची ठरली होती. या रिल्सला संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदार संघातून चांगलाच प्रतिसाद मिळालेला होता. व त्यामुळे मतदानाचे प्रमाण वाढण्यास चांगलीच मदत झाली होती.त्यामुळे सदर्हू रिल्सची महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक विभागातर्फे जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन,रविवार दि. 26 जानेवारी 2025 रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या शासकिय कार्यक्रमात प्रमुख भूमिका वठविणाऱ्या कु.अमृता रामेश्वर पंचांगे हिला रिल्समधील भूमिकेबद्दल पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक म्हणून सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून वाशिम जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री ना. हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. ; मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या उपस्थितीत गौरवांकित केले आहे. तिच्या या यशाबद्दल महाराष्ट्र गोंधळी समाज संघटना,विदर्भ लोककलावंत संघटना, महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषद, साप्ताहिक करंजमहात्म्य आदीच्या वतीने कु अमृता रामेश्वर पचांगे हिचे अभिनंदन करण्यात येत असून अध्यक्ष संजय कडोळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.