एप्रिल पासूनचा थकीत मानधन द्या.28 जून रोजी आरोग्य संचालकांनी काढलेला आशा वर्कर वरील अन्याय कारक परिपत्रक रद्द करण्याची आयटक ची मागणी.
चंद्रपुर;--आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने कॉ विनोद झोडगे राज्य सचिव यांच्या नेतृत्वात चंद्रपुर जिल्हा परिषद कार्यालय समोर सरकार व प्रशासन विरोधात घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करून मा मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन एप्रिल पासूनचा वाढीव थकीत मानधन,कोरोना प्रोत्साहन भत्ता व 28 जून रोजी आरोग्य संचालकांनी काढलेला आशा वर्कर वरील अन्यायकारक परिपत्रक रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जी मोहीम हाती घेतली होती त्या कामामध्ये आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी अगदी तुटपुंज्या मानधनात महत्वाची भूमिका बजावली होती एवढेच नाही तर आरोग्य विभागाचे 78 प्रकारचे कामे त्यांच्या कडून राबवून घेतले जातात परंतु त्या बदल्यात मिळणारे अत्यल्प मानधन सुधा चार चार महिने मिळत नाही ही अत्यंत संताप जनक बाब आहे काही कामे तर विना मोबदला त्यांच्या कडून बळजबरीने करवून घेतले जातात .आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका आशा वर्कर कडून सातत्याने सुरळीतपणे निभवली जात असतांना सुद्धा ,आरोग्य संचालकांनी 24 जून 2022 रोजी एक आदेश काढून कामात हयगय करणाऱ्या आशा वर्कर ला कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे हे अत्यंत चुकीचे असून गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या आशा वर्कर वर अन्याय होणार आहे तेव्हा वरील आदेश तातडीने रद्द करण्यात यावा अन्यथा आयटक च्या नेतृत्वात राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा देत आशा वरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका संघटनेचे राज्य सचिव कॉ विनोद झोडगे यांनी घेतली आहे.
सदर आंदोलनात निवेदनाद्वारे आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी आपल्या अनेक समस्या मांडल्या ज्या मध्ये आरोग्य वर्धिनी अनंतर्गत इंसेंटिव्ह फार्म चे मासिक मिळणारे 1000 रुपये मागील एप्रिल 2021 पासून थकीत आहेत ते त्वरित देण्यात यावे,वाढीव मानधन गेल्या 4महिन्या पासून थकीत आहे,काही ठिकाणी कोरोना प्रोत्साहन भत्ता आक्टोंबर पासून मिळाला नाही,राजुरा तालुका सहित अनेक तालुक्यातील एम.डी. चे पैसे, कुष्ठरोग,क्षयरोग सर्वेक्षण व आय पी पी चे दोन वर्षा पासूनचा थकीत मोबदला त्वरित देण्यात यावा. कर्मचाऱ्यांनचा नियमित मोबदला मे महिन्या पासून थकीत आहे ते त्वरित द्या.दि 31/3/2020 च्या ग्राम विकास खात्याच्या परिपत्रक नुसार ग्राम पंचायत निधीमधून मे 2020 पासून कोरोना काम संपेपर्यंत मासिक 1000 रु आशा व गट प्रवर्तक यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा शासन निर्णय आहे त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. माझे कुटुंब,माजी जबाबदारी सर्वेक्षणाचा थकीत मोबदला देण्यात यावा. दर महिन्याला वेतन चिट्टी देण्यात यावे,केंद्र सरकारने एप्रिल 2022 पासून कोरोना प्रोत्साहन भत्ता देण्याचे बंद केल्याने कोरोना चे काम आशा वर्कर वर सक्तीने लादू नये किंवा त्याचा मोबदला देण्याचा मान्य करावा.राज्य सरकार कडून देण्यात येत असलेल्या वाढीव मानधनात कसल्याही प्रकारची कपात करू नये व यापूर्वी कपात केलेली रक्कम फरका सहित देण्यात यावी .कर्मचाऱ्यांच्या समस्या बाबत दर 3 महिन्यातून संघटने सोबत बैठक बोलविण्यात यावी.आशा व गट प्रवर्तक महिलांना किमान 24 हजार वेतन,शासकीय दर्जा,सामाजिक सुरक्षा,म्हातारपणी पेन्शन,आदी मागण्या विषही चर्चा केली असता स्थानिक मागण्या तातडीने सोडविण्याचे मा मूख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मान्य केले आहे.मागण्या न सुटल्यास पुढील लढा तीव्र करणार असल्याचा निर्णय आशा व गट प्रवर्तक महिलांनी घेत त्याच्या तयारी साठी येत्या 31 जुलै 2022 रोजी संघटनेचा जिल्हा अधिवेशन चंद्रपुर येथील नागाचारी महाराज सभागृह ,गुरू माऊली मंदिर जवळ घेणार असल्याचे कॉ विनोद झोडगे यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी आयटक चे संघटक कॉ रवींद्र उमाटे, जिल्हा सचिव ममता भीमटे,शालू लांडे,निकिता निर,मीना चौधरी,सुनंदा मुलमुले,उषा नंदनवार,सुषमा येनगंटीवार,ज्योति पाटील,मनीषा खामनकर, पौर्णिमा सूर्यवंशी, मनीषा डेरकर, परवीन सय्यद,रूपा ठाकूर,सविता गठलेवार,प्रतिमा कायरकर,कुसुम मेश्राम, प्रतीक्षा पांडे,अंजुषा डवरे,छाया बोदेले,ज्योत्स्ना ठोंबरे,ज्ञानेश्वरी चौधरी,आशा रामटेके,खोब्रागडे यासह जिल्ह्यातील शेकडो आशा व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होत्या.
आपला
कॉ विनोद झोडगे राज्य उपाध्यक्ष आशा व गट प्रवर्तक संघटना संलग्न आयटक चंद्रपुर
आपल्या प्रतिक्रिया द्या....