आज जगात माणसाने आत्मिक ओळख आणि परमात्मस्वरूपाची पारख न ठेवता,जो काही उच्छाद मांडला. त्यामुळे मानवाला त्याने केलेल्या 'कर्माचे म्हणजे पापाचे फळ' इथेच भोगावे लागणार आहे.हे पृथ्वीवर वारंवार घडणाऱ्या घटनांवरून लक्षात घेतले पाहिजे.आज संपूर्ण जग विनाशाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचले आहे.एक देश दुसऱ्या देशासोबत युद्ध करीत असून जगात केव्हाही तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.शिवाय प्रांत आणि धर्म,पंथ,भाषेच्या नावावर गृहकलय-गृहयुद्ध सुरू आहेत.शेजारी देशामध्ये सत्ता परिवर्तन होत आहे. एकमेकांच्या संहाराने दररोज माणसं मरत आहेत.तर दुसरीकडे भूकंप,ज्वालामुखी,मोठ मोठी वादळं.चक्रीवादळ,भुस्खलन, अतिवृष्टी,ढगफुटी होत आहे. कधी पाहिला नव्हता एवढा नरसंहार,जीवीतहानी,मानवी आपदा आणि दुर्घटना (विमान,रेल्वे दुर्घटना, भिषण असे बॉम्ब हल्ले),भूकंप,भूस्खलन,अतिवृष्टी ढगफुटीच्या कहरात गावच्या गावे उध्वस्त होऊन लाखो हेक्टर जमिन पाण्यात खरडून गेल्याच्या घटना दररोज घडत आहेत.स्वतःच्या स्वार्थापायी माणसाने सृष्टीला,निसर्गाला आव्हान देवून,नदीनाल्यांचे प्रवाह अडवीले किंवा कायमचे बंद केले आहेत.पर्वतरांगा,डोंगर आदींचे खच्चीकरण,वारे माप जंगलतोड आणि वृक्षांची कटाई केली आहे. जीवन साखळीतील हजारो पशू पक्षी नष्ट केले आहेत. स्वस्वार्थासाठी लाखो गावात सुपिक जमिनीचे रूपांतर सिमेंटीकरण करून काँक्रीटच्या हमारतीमध्ये केले आहे.नष्ट न होणाऱ्या प्लॉस्टिकचा आणि इतर टाकाऊ वस्तूचा कचरा वाढवीला आहे.माणसाने स्वस्वार्थासाठी सुर्य,चंद्र,मंगळ,पृथ्वीशी जीवघेणी स्पर्धा चालवीली आहे. म्हणे पृथ्वीला आरपार छिद्र पाडून ब्रम्हांडाचा शोध घ्यायचा ? चंद्रावर-मंगळावर मानवीवस्ती उभारून तेथे आपलीच सत्ता गाजवायची.असले नसते उद्योग वाढवीले असल्यामुळे शेवटी निसर्ग राजा सुद्धा माणसावर कोपला आहे.पर्यावरणाच्या प्रचंड हानीमुळे आतातर जंगले,नदी,नाले,विविध वृक्ष,पशू,पक्षीच एकतर नष्ट झाले आहेत. किंवा लवकरच नामशेष होणार आहेत. मानवाच्या असल्या प्रतापाने पर्यावरणाची हानी होऊन,सूर्यनारायण आग ओकत आहेत.तर दुसरीकडे समुद्र महासमुद्र सुद्धा खवळत आहेत.त्यामुळे वाऱ्याची दिशा बदलली असून,ऋतुचक्रही पार बदलून गेले आहे.इथे आतातर एकीकडे भर दिवसा भयंकर तापत आहे.तर दुसरीकडे ढगफूटी होऊन अतिवृष्टी होत आहे. तिसरीकडे थंडीने अंग अंग कुडकूडत आहे.त्यामुळे आता तर सर्वच जाती,धर्म,पंथ,धार्मिक संस्थानानी सांगितलेल्या धर्मग्रंथा मधील भविष्यवाणी प्रमाणे महाप्रलय होऊन पृथ्वी नष्ट होणार असल्याची त्यांची वाक्ये खरी ठरणार.हेच सिद्ध होत आहे.आज घराघरात,भावा भावात,बापलेकात नाती गोती ऊरली नाही. माया, ममता, प्रेम, सद्भावना, दयाभाव,आपुलकी कुणामध्येच राहीलेली नाही. स्वतःच्याच वयोवृद्ध आई-वडिलांचा,भावा बहिनीचा, सास सुनेचा,सन्मान उरला नाही. आज एकीकडे जीवंतपणी आईवडिलांना वृद्धाश्रम नावाच्या कारावासात घातले जात आहे.तर दुसरीकडे स्वतःच्या काळजाच्या तुकड्यांना पाळणाघर नावाच्या कोंडवाड्यात बंदिस्त करून आजचे तरुण तरुणी स्वतःच्या अट्टाहासापायी स्वतःचे छंद पूर्ण करण्यासाठी,मनमोकळे व्यवसाय करीत आहेत.शिवाय बापदाद्यांनी कमविलेल्या जमीनी,घरे दारे,शेती वाडयांचे तुकडे तुकडे होत आहेत. संपत्तीच्या हिस्स्यासाठी एकमेकांच्या जीवावर माणूस उठला आहे.स्वार्थापायी अक्षरशः स्वकियांच्याच रक्ताचे पाट वहात आहेत.एकाचेही कर्म चांगले राहीले नाहीत.विश्वास ठेवावा असा कोणता माणूसच दिसत नाही.जगात माणूसकी नावालाही दिसत नाही.सत्ता आणि संपत्तीच्या मोहापायी कुणाचही कर्म चांगलं राहीले नाही.आणि त्यामुळे आज अख्ख्या जगात घडणारे युद्ध,महायुद्ध,दुर्घटना,नैसर्गिक आपत्ती,अतिवृष्टी किंवा प्रलय होत आहेत.आता मानवाचे वाईट कर्मच त्याच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.जगात अशी महायुद्धे,अतिवृष्टी, प्रलय येत राहिले तर एक दिवस येथे खायला अन्न,प्यायला पाणी आणि श्वास घ्यायला प्राणवायू सुद्धा राहणार नाही.हे त्रिकालाबाधीत सत्य आहे.व याला कारणीभूत प्रत्येक माणूसच राहणार आहे.पृथ्वीवरील कलीयुगाचा अंत जवळ आला असल्याचे हे द्योतक आहे.तेव्हा आतातरी आजच्या महाप्रलयाच्या बिकट परंतु सत्य परिस्थिती वरून माणसाने धडा घेऊन स्वार्थ सोडून सज्जन झालं पाहिजे.सत्ता आणि संपत्तीचा मोह सोडून निःस्वार्थ जीवन जगलं पाहिजे.काळ वाईट आहे. तुमचं 'जसं कर्म तसं फळ' तुम्हाला याच जन्मात मिळणार आहे.त्यासाठीच मानव प्राणी असा दुर्घटना किंवा नैसर्गीक आपत्तीने अकाली मृत्युमुखी पडत आहे.परंतु यापुढे थोडीफार मृत्युची भिती बाळगून आपले पुण्यकर्म किती ? आणि पापकर्मे किती ? याची स्वतःशीच मोजदाद करून मृत्युनंतर तरी मोक्ष मिळायला हवा.याची जाणीव ठेवून यानंतर तरी आपल्या वागण्यात सुधारणा व्हावी.यासाठी हा अल्पसा प्रयत्न.
शब्दशिल्पी :
संजय कडोळे, (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग सेवक तथा ज्येष्ठ पत्रकार) कारंजा (लाड) जि. वाशीम.
आपल्या प्रतिक्रिया द्या....