महाविद्यालयात अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. काही विद्यार्थी मेहनत आणि जिद्दीने उच्चपदावर पोहचतात, ते पालकांसाठी आणि महाविद्यालयासाठी अतिशय अभिमानाची बाब असते. महाविद्यालयातून तयार झालेला विद्यार्थी ही आपली पुंजी असते. ते उच्चपदावर जाणे हे आपल्यासाठी गौरवस्पद आहे. असे मत नेवजाबाई अशोक जी भैया शिक्षण संस्था सचिव मा. अशोक भैया यांनी व्यक्त केले. ते येथील स्व. हिरालाल भैया सभागृहात शिक्षक, पालक व माजी विद्यार्थी सभेचे उद्घाटक म्हणून बोलत होते.विचारपिठावर प्राचार्य डॉ डी एच गहाणे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ शंकर कुकरेजा, प्रमुख उपस्थितीत अँड धिरज अलगदेवे, डॉ विश्रामजी नाकाडे, डॉ सुभाष शेकोकर, समिती प्रभारी डॉ राजू आदे उपस्थित होते. यावेळी अँड अलगदेवेंनी "यावे ज्ञानासाठी निघावे सेवेसाठी "या संस्थेच्या ब्रीद वाक्यावर प्रकाश टाकला. डॉ नाकाडेंनी जेव्हाचे काम तेव्हा करणे गरजेचे आहे, हे कथारुपाने समजावून सांगितले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.डी एच गहाणेंनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीचा व इतर सुविधांचा परिचय देऊन माजी विद्यार्थी जे फंड प्रदान करतील त्याचा वापर गरजू, होतकरु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या रुपाने देण्यात येईल, असे सांगितले.या कार्यमाप्रसंगी महाविद्यालयातील नवनियुक्त प्राध्यापक, शिक्षक व नोकरीवरील माजी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील गरजू, होतकरु 72 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. यावेळी लिमंत्रिका नवघडेंनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती प्रभारी डॉ राजू आदेंनी केले. संचालन प्रा. निलिमा रंगारी, डॉ सुभाष शेकोकर तर आभार प्रा कृतिका बोरकरांनी मानले. कार्यक्रमाला बहूसंख्येने पालक, माजी विद्यार्थी व प्राध्यापक वृध्द व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी डॉ धनराज खानोरकर, प्रा जयेश हजारे, डॉ अतुल येरपुडे, प्रा आनंद भोयर, माणिक दुपारे, संजू मेश्राम यांनी परिश्रम घेतले