कारंजा तालुका प्रतिनिधी- जि. प. वरीष्ठ प्राथमिक मराठी शाळा यावार्डी तालुका कारंजा येथील दिनांक 31/08/2024 ठीक 11:00 वाजता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांची निवड करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये मोहन कदम यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष पदी गजानन घनगाव तर सदस्य पदी अश्विनी विठ्ठल पारे, अर्जुन आत्माराम भोयर, अश्विनी महादेव कदम, प्रिया राहुल लाडोने व छाया गजानन ईंगोले यांची सदस्य पदी निवड करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्यध्यापक विनोद हनुमंते यांचे सह सर्व शिक्षक वृंद व गावकरी मंडळी उपस्थित होते.