वाशिम : येत्या दि.२६/२/२०२४ रोजी, अकोला जिल्ह्यातील सक्षम सामाजिक संघटनेद्वारा दिव्यांग व आदिवासी सामुहीक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सक्षम समाजिक सघंटने तर्फे नागरीकांना विनम्र आवाहन करण्यात येते की, जर आपल्या संपर्कात अपंग दिव्यांग बांधव असतील कि ज्यांची लग्न जूळलेले आहेत परंतू काही आर्थिक अडचणी मूळे त्यांना विवाह करणे पैशाअभावी शक्य नाहीत अश्या विवाहेच्छुकांकरीता सघंटनेद्वारे त्यांचा विवाह हा सामूहिक सोहळ्यामधे मोठ्या थाटा माटात लावून देण्याचे ठरविण्यात आले आहे .तरी अश्या गरजवंत विवोहोच्छुक लोकांपर्यत हा संदेश पोहचवावा व जर वर किंवा वधू दोघांपैकी कोणी एक पण अपंग असेल तर त्यांना समाज कल्याण विभागा तर्फे प्रोत्साहन म्हणून पन्नास हजार रुपयांचे अनूदान देण्यात येईल व सघंटनेच्या वतिने तसेच उपस्थित प्रमूख पाहूणे मंडळींच्या वतीने सुद्धा नवविवाहित वर वधू यांना जिवनोयोगी साहित्याच्या भेट वस्तू देण्यात येतील. तरी संपर्क :- सक्षम सामाजिक संघटन, अकोट व तेल्हारा मो नं 9309922886 किंवा 7038000702 यांचेशी संपर्क साधावा. टिप :~ सामूहिक विवाह सोहळा मर्यादित जोडप्यांकरिता असून प्रथम नाव नोंदवणाऱ्या जोडप्यांना प्राधान्य देण्यात येईल.