कारंजा : स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना आणि साप्ताहिक करंजमहात्म्यच्या संयुक्त विद्यमाने, अखिल भारतिय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ मुंबईचे सदस्य तथा नाट्यकलावंत नंदकिशोर कव्हळकर यांच्या वाढदिवसानिमित्त,स्थानिक जागृत संस्थान,श्री हनुमान संस्थान भिलखेडा येथे संस्थेचे अध्यक्ष संजय कडोळे यांच्या पुढाकारातून,लोककलावंताच्या श्रावणधारा मैफिलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये,प्रमुख पाहुणे -अमरावती विधान परिषद शिक्षक मतदार संघाचे सदस्य आ.अँड किरणराव सरनाईक, जि.प.समाज कल्याण विभागाचे माजी सभापती जयकिसनजी राठोड,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त रामबकस डेंडूळे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रदिप वानखडे,गोविंदराव मुंदेकर, पप्पूसेठ उपाख्य नितीनसेठ भट हे होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या शिक्षक आमदार अँड. किरणरावजी सरनाईक यांनी अमरावती शिक्षक संघाच्या वतीने विदर्भ लोककलावंत संघटनेचे पदाधिकारी तथा नाट्यकलावंत नंदकिशोर अंबादासजी कव्हळकर यांचा शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ देवून भव्य सत्कार केला.तत्पूर्वी प्रारंभी कार्यक्रमाला आलेल्या आमदार किरणरावजी सरनाईक यांनी भिलखेडा येथील जागृत श्री हनुमानाचे दर्शन घेतले.आणि रम्य वातावरणात कार्यक्रम आयोजीत केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी आ.अँड किरणराव सरनाईक आणि पाहुण्यांचे विदर्भ लोककलावंत संघटनेच्या वतीने नंदकिशोर कव्हळकर,रामबकसजी डेंडूळे,संजय कडोळे,अँड संदेश जिंतुरकर ,संजय नेमाने यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी अमरावती विभागीय शिक्षक संघ वाशिमचे प्रा.डॉ. के. बी.देशमुख सर,प्रा.आर एम.मडके सर,प्रा.भास्करराव सोनोने सर,प्रा.माणिकराव देशमुख,प्रविण खडसे इ. पाहुणेमंडळी उपस्थित होती.
श्रावणधारा मैफिलीमध्ये कविवर्य ओंकार मलवळकर, हिमंतराव मोहकर,अँड संदेश जिंतुरकर,रोमिलसेठ लाठीया, डॉ.ज्ञानेश्वर गरड,डॉ.इम्तियाज लुलानिया,उमेश अनासाने,श्याम घारु,प्रदिप वानखडे,पप्पूसेठ भट,गोविंदराव मुंदेकर,संजय नेमाने,रामबकस डेंडूळे,अतुल धाकतोड,रविन्द्र नंदाने गुरुजी, गिरीष जिचकार,दत्तात्रय बेलबागकर,संगीत विशारद प्रल्हादराव लुंगे,सुभाष पाटील गाडगे,गोपिभैय्या डेंडूळे,देविदास नांदेकर इत्यांदींनी आपल्या रचना सादर करीत विदर्भ लोककलावंत संघटनेचे नाट्यकलावंत नंदकिशोर कव्हळकर यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.यावेळी नंदकिशोर कव्हळकर यांना शुभेच्छा देतांना आमदार अँड.किरणराव सरनाईक म्हणाले की, कारंजा नगरीतील माझे विश्वासू जुने जाणते मित्रमंडळ हिचं माझी शक्ती हाच माझा विश्वास असल्याने माझ्या महत्वाच्या वेळेमधून वेळ काढून मी नंदकिशोर कव्हळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरीता हजर राहीलो आहे. याप्रसंगी,रमेश ढेणवाल,विजय घारू,ईश्वर चौधरी मेहरोलीया, संजय ढेणवाल इत्यादीची कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....