तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जाणारी ३३ जनावर विश्व हिंदू परिषद वबजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली गावाजवळ वाहनासह पकडली.
त्यानंतर अहेरी पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी वाहनासह जनावरे ताब्यात घेतली.जिल्ह्यातून टीएस ०१ यूए १६९८ क्रमांकाच्या मेटॅडोरमधून गोवंश तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेले जात होते. याबाबतची माहिती विहिप व बजरंग दलाचे कार्यकर्ते नेलकुद्री, तुलसीगिरवार, जिलेल्ला यांना मिळाली. त्यांनी वांगेपल्लीजवळ वाहन अडविले व तपासणी केली असता वाहनात गोवंश आढळून आले.