कारंजा (लाड) : नुकत्याच काँन्हेन्ट,शाळा,कॉलेज सुरु झालेल्या असून,आजकाल कॉन्व्हेन्ट,शाळा,कॉलेज या विद्यार्थ्यांच्या घरापासून लांब असतात.आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे आईवडिल किंवा पालक हे स्वतः मुलांना कॉव्हेन्ट, शाळा,कॉलेजमध्ये ने आण करू शकत नाहीत.व त्यामुळे मुलांकरीता स्कूल बस असली तर ठिक.नाहीतर मुलांकरीता खाजगी वाहने,बस किंवा हल्ली अँटोरिक्क्षाने विद्यार्थ्यांची शाळेमध्ये ने आण केली जाते. परंतु बरेच वेळा त्या अँटोरिक्क्षा चालकाकडे वाहन परवाना नसतो.तसेच काही वाहन चालक व्यसनी असू शकतात.त्यामुळे "प्रत्येक पालकांनी,आपण ज्या वाहनाद्वारे मुलांना शाळेत पाठवतो.त्या वाहनाचा मालक किंवा चालक निर्व्यसनी आहे किंवा नाही.तंबाकू,गुटखा,दारु किंवा तत्सम नशा तर करत नाही ना ? याची,आणि तुमच्या विश्वासाला पात्र आहे की नाही ? याची खात्री करूनच मुलांना ने आण करण्याची जबाबदारी, वाहनचालक याचेवर सोपवा.तसेच त्याचे वाहन किंवा अँटो रिक्क्षा त्याचा स्वतःचा आहे.किंवा भाड्याने चालवीत आहे ? त्याचे कडे वाहनाची कागदपत्रे आहेत का ? वाहन चालविण्याचा परवाना आहे का ? याची सुद्धा चौकशी करा.तसेच महत्वाचे म्हणजे वाहन क्रमांक आणि वाहनाचा फोटो,त्याचा चालक परवानाची प्रत,आधारकार्डाची प्रत, वाहन चालकाचा फोटो तुमच्याकडे,मोबाईलमध्ये असू द्या.तसेच ज्या वाहनाने मुलांना शाळेत पाठवता.त्याची कल्पना तुमच्या मुलाच्या शिक्षण संस्थेला,शाळा विद्यालयाला, मुलाच्या टिचरला असू द्या.आणि आपण आपल्या मुलांचे बाबत सर्वोतोपरी सुरक्षित रहा." असे मार्गदर्शन,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.