कारंजा : दिनांक 17 दिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.खा. सुनील तटकरे व रा.कॉ.पा सोशल मिडिया सेल प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्या मान्यतेने हमीद शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया सेल वाशिम जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र रा.कॉ.पा. वाशिम जिल्हाध्यक्ष मो. युसुफ पुंजानी, दत्तराज डहाके माजी नगराध्यक्ष कारंजा,श्री देवव्रत डहाके यांचे हस्ते देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रसार, विस्तार व पक्ष संघटन मजबूत होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री अजितदादा पवार साहेब यांचे विकासात्मक विचार समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहचावे यासाठी संपूर्ण वाशिम जिल्ह्यात घर तेथे राष्ट्रवादी ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने दि.१७ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री सुनील तटकरे साहेब व रा.कॉ.पा सोशल मिडिया सेल प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्या मान्यतेने हमीद शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया सेल वाशिम जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे पत्र राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष मो. युसुफ पुंजानी, दत्तराज डहाके माजी नगराध्यक्ष कारंजा,देवव्रत डहाके यांचे हस्ते पक्ष कार्यालय पुंजानी कॉम्प्लेक्स कारंजा येथे देण्यात आले यावेळी,श्री राजेश नेमाने तालुकाध्यक्ष मानोरा,श्री अमोल ठाकरे तालुकाध्यक्ष कारंजा,श्री चंदुभाऊ राठोड तालुका सचिव मानोरा,असलम पोपटे तालुका सरचिटणीस मानोरा,श्री पियुष अरुण राठोड,श्री संजय राठोड कारंजा मानोरा विधानसभा संपर्क प्रमुख,ॲड.फिरोज शेकूवाले माजी गटनेता न.प कारंजा, जाकीर शेख माजी शिक्षण सभापती न.प कारंजा, सय्यद मुजाहिद मा.नगरसेवक कारंजा, रमेश उपाध्ये यांचे मुजाहिद खान, इमरान पोपटे सदीम नवाज सह बहुसंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.