कारंजा (लाड ) : दि . 30 कारंजा शहरात महसूल विभागाकडून विना रॉयल्टी रेतीवाहतुक करणाऱ्या ट्रकवर कार्यवाही करण्यात येवून ट्रक तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आला.
दिनांक 30 जून 2022 रोजी दुपारी तीनचे सुमारास कारंजा तहसीलचे तहसीलदार धीरज मांजरे यांचे मार्गदर्शनात तलाठी अमोल वक्ते यांनी अवैध वाहतूक करणाऱ्या रेतीचा मोठा ट्रक वर कारवाई करून तहसील कार्यालय येथे लावण्यात आला.
हा ट्रक वाहन क्रमांक एम एच 37 T 1669 दिनेश रामस्वरूप शर्मा रा . कारंजा याच्या मालकीचा आहे. असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद वाशिमला मिळाले असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसार माध्यमाला कळवीले आहे . या ट्रकवर दंडात्मक कारवाई करण्याचे काम सुरू आहे, यामुळे रेतीच्या अवैध वाहतूकीस आळा बसण्याच मदत होणार आहे.