कारंजा : आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी आज सकाळ पासून विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूकीचा आढावा घेतला असता, पदवीधार मतदार संघ निवडणूकीबाबत उत्सुक नसल्याचे आढळून येत होते. अनेक पदवीधर मतदार तर एखादा उमेदवार आपणास निवडणकी करीता भ्रमणध्वनीवरून किंवा प्रत्यक्ष भेटून संवाद साधून आपणास मतदानाचा आग्रह करणार काय ? याची वाट बघत होते . मात्र उमेद्वारा कडून तसे काहीच घडले नसल्याने अनेक मतदार मतदान करायला घराबाहेर पडलेच नाहीत . हे वास्तव आहे. तर कारंजा शहरात मात्र स्थानिक महाविकास आघाडी पक्ष नेते आणि कार्यकर्ते मात्र निवडणूकी करीता मतदारांचा उत्साह वाढवीत होते. शिवाय नव्याने नोंदणी झालेले मतदार मात्र विधान परिषद निवडणूकी करीता त्यांची अमरावती विधानपरिषद पदवीधर मतदार संघाची मतदान करण्याची पहिलीच वेळ असल्याने आनंदी दिसत होते अधिक वृत्त असे की,अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज 30 जानेवारी रोजी जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण 26 मतदान केंद्रावर या निवडणुकीसाठी मतदान झाले.जिल्ह्यातील एकूण 18 हजार 50 मतदारांपैकी 9 हजार 891 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदानाची टक्केवारी 54.80 टक्के इतकी आहे.सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान झाले. या निवडणुकीतील 23 उमेदवारांचे भाग्य आज मतपेटीत बंद झाले.
वाशिम तालुक्यातील 2 हजार 346 पुरुष आणि 733 स्त्री असे एकूण 3 हजार 79 मतदार, मालेगाव तालुक्यातील 875 पुरुष आणि 149 स्त्री असे एकूण 1 हजार 24 मतदार, रिसोड तालुक्यातील 1 हजार 418 पुरुष आणि 285 स्त्री आणि एक इतर अशा एकूण 1 हजार 704 मतदार,मंगरूळपीर तालुक्यातील 1 हजार 39 पुरुष आणि 276 स्त्री अशा एकूण 1 हजार 315 मतदार, कारंजा तालुक्यातील 1 हजार 548 आणि 627 स्त्री अशा एकूण 2 हजार 175 आणि मानोरा तालुक्यातील 474 पुरुष आणि 120 स्त्री अशा एकूण 594 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.वाशिम तालुका - 51.71 टक्के,मालेगाव तालुका - 59.05 टक्के,रिसोड तालुका - 58.94 टक्के, मंगरूळपीर तालुका - 57.15 टक्के,कारंजा तालुका - 54.10 टक्के आणि मानोरा तालुका - 51.65 अशी आहे. असे संजय कडोळे यांनी कळवीला आहे .