वाशिम : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील एकूण 23 शाळांमध्ये 147 ग्रीन बोर्डचे वाटप कार्यक्रम अमरावती विभागीय शिक्षक संघटना वाशिमचे जिल्हाध्यक्ष तथा अमरावती विधान परिषद मतदार संघाचे लोकप्रिय शिक्षक आमदार ऍड. किरणराव सरनाईक यांच्या हस्ते पार पडला. हा कार्यक्रम बापुरावजी देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चांदूर रेल्वे येथे पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे उपाध्यक्ष गजाननराव फुंडकर साहेब तथा अशोकराव देशमुख सदस्य शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचप्रमाणे दिपकराव खेरडे अध्यक्ष श्रीकृष्ण विद्यालय आमला, विश्वेश्वरराव देशमुख तुकडोजी विद्यालय मालखेड, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तळोकार सर, प्राचार्य अशोकराव मोटघरे सर ,प्राध्यापक शशांक देशमुख सर, प्रा के बी देशमुख सर,प्रा भास्कर सोनुने सर तालुक्यातील सर्वच शाळांचे मुख्याध्यापक तथा शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बी .डी. एस. विद्यालयाचे प्राचार्य मोटघरे सर ,तायडे सर तथा त्यांच्या शाळेतील सर्वच शिक्षक बंधू भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. जे.बी.शेंदूरजने मॅडम यांनी केले. असे वृत्त आमचे प्रतिनिधी बंडू आठवले यांनी कळवीले आहे.