नागभीड :
बस् यूॅंही किशोर मुगलचा हिंदी गझलसंग्रह आणि संजय येरणे यांच्या "नामालूम" किशोर मुगल व्यक्तीजीवन कविता आणि समीक्षा या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा अमरावती येथील मुगलसराय या गृहप्रवेश व निसर्गच्या वाढदिवस प्रसंगी संपन्न झाला.
बस् यूॅंही गझल संग्रहाचे प्रकाशन श्री शिवराम भोंडेकर ज्येष्ठ कवी यांचे हस्ते तर "नामालूम" या पुस्तकाचे प्रकाशन मंदाबाई दत्तात्रय मुगल आणि नीता किशोर मुगल यांचे हस्ते पार पडले. प्रकाशन सोहळ्यास साहित्यीक प्रमोद काकडे, सुनील यावलीकर, नितीन देशमुख, विशाल इंगोले, पवन नालट, गजेंद्र हिंगणकर, अनिल लळे, ललित कदम, प्रकाश वाघमारे, भूपेश नेतनराव, डॉ. अरूण मानकर, यशवंत मोहिते, दिवाकर देशमुख, चंद्रकांत जाधव, अशोक वाठ, अजय पडघान, बाबुभाई पटेल, राजेश राजगडकर, किशोर जामदार, प्रदीप देशमुख, नरेशकुमार बोरीकर, गोपाल शिरपुरकर, संदीप देशमुख, संदीप वाटाने, पूनाराम निकुरे, यासह विविध जिल्ह्यातील साहित्यीक उपस्थित होते. कविवर्य वैभव भिवरकर यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. मान्यवर मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत अविस्मरणीय असा पार पडला.
आपल्या प्रतिक्रिया द्या....