वरोरा :- वरोरा तालुक्यातील अवघ्या 6 कि. मी. अंतरावर वसलेल्या चरूरखटी गाववासीयांना पावसाळ्याच्या दिवसात कमी उंचीच्या पुलामुळे अनेक संकटाशी सामना करावा लागत आहे. या पुलाची उंची वाढवून रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी ग्रामवसियानी निवेदनातून केली आहे.
वरोरा - माढेळी या मुख्य रस्त्यावरून 2 कि. मी. अंतरात चरूरखटी हे गाव वसलेले आहे. या गावातील लोकसंख्या 1716 आहे. या गावातील बहुतांश नागरिक, शाळकरी मुले रोजंदारीसाठी, शिकण्यासाठी वरोरा येथे येत असतात. या गावाला पाटीवरून ( थांबा ) जाण्यासाठी 2 ते 3 कि. मी. अंतर गाठावे लागते. या रस्त्यावर एक छोटा 5 ते 6 फुट उंचीचा पूल आहे. हा पूल पावसाळ्याच्या दिवसात या पुलावरून 7 ते 8 फूट पाणी वाहत असते. त्यामुळे चरूर(खटी) या गावांशी संपर्क तुटला जातो. सन 2023 - 24 ला पूर आल्याने तीन ते चार दिवस गावाचा संपर्क तुटल्याने जीवनोपयोगी वस्तू ने आण करणे, ये - जा करणे अशक्य होते. या गावातील अनेक शाळकरी मुले - मुली वरोरा येथील शाळेत शिक्षण घेत आहे. एवढेच नव्हे तर एक वर्षांपूर्वी गावातील नानाजी खामनकर वय 50 वर्ष यांना उपचारार्थ वरोरा येथे नेणे शक्य न झाल्याने ते उपचारा अभावी मरण पावले , गावात आजच्या स्थितीत अनेक महिला गर्भवती असल्याचे नागरिकांनी सांगितले त्यामुळे पुरसदृश्य स्थिती निर्माण झाल्यास मनुष्यहानी होण्याची संभावनाही नाकारता येत नाही. गावातील महिला पुरुष यांची रोजंदारीची कामे ही थांबल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर येते अशा अनेक समस्या घेऊन गावातील होतकरू मुलांनी आज दिनांक 23 जुलै रोजी वरोरा येथील तहसील कार्यालय गाठून तहसीलदार योगेश कौटकर यांना निवेदनातून वरील मागणी केली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हा परिषद उपविभाग,वरोरा. खासदार, प्रतिभा धानोरकर यांनाही डेण्यात आले, यावेळी पवन विनायक नांदे, दिनेश गंगाधर नांदे, व्यंकटेश रामकृष्ण ठावरी, सुदर्शन अरुण घागी, आकाश महादेव खेकारे, मनोज धोंडू पिंगे, विलास कोंडू वाढई, अरुण शंकर बाधे, जनार्दन तुकाराम भोयर, अमित सुरेश सातपुते, विकास पांडुरंग गायकवाड, बंडू गोविंदा टमाटे, आशिष मारुती जरीले, मयूर देवराव घागी. उपस्थित होते
चौकट:-
चारूरखटी या गावाला जाणाऱ्या मार्गावर असलेल्या पुलाचा हा विषय सार्वजनिक बांधकाम विभागाचा असून याबाबत आपले निवेदन वरील विभागाला पाठवून याचा पाठपुरावा करू असे सांगितले.
योगेश कौटकर
तहसीलदार वरोरा
चौकट:-
या पुलाचे बांधकाम निर्बान ठेकेदार यांनी आपल्या वाहनांना जाण्यासाठी केल्याचे होते त्याला ही अनेक वर्ष झाले आहे. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने गावात पावसाळ्याच्या दिवसात अनेक समस्या निर्माण झाले आहे.