कारंजा (जिल्हा प्रतिनिधि संजय कडोळे)-
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय दिल्ली,भारत सरकार यांचे कार्यक्रमांतर्गत राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था नागपूर यांचे निर्देशानुसार माध्यमिक शिक्षण विभाग, मुख्याध्यापक संघ व विज्ञान अध्यापक मंडळ वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने दि. 21 जुलै 2023 रोजी हैप्पी फेसेस स्कूल वाशिम येथे सकाळी 10:30 त 5:00 वाजेपर्यंत विज्ञान शिक्षकाकरीता इन्स्पायर्ड अवॉर्ड मानक 2023-24 नॉमिनेशन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती.या कार्यशाळेत विज्ञान शिक्षक हा शाळेचा कणा आहे,असे गौरव उदगार माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे यानी आपल्या अध्यक्षीय भाषणात काढले.
कार्यशाळेला उदघाटन म्हणून हैप्पी फेसेस स्कूलचे संचालक दिलीप हेडा,अध्यक्ष म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेन्द्र शिंदे तर प्रमुख अतिथी म्हणून विज्ञान अध्यापक मंडळाचे प्राचार्य संतोष गिहरे,प्रभारी विज्ञान पर्यवेक्षक ललित भूरे,हैप्पी फेसेसचे प्राचार्य प्रवीण नसकरी,
इंस्पायर अवार्डचे जिल्हा प्रसारक विजय भड तसेच कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय संशोधक सत्यनारायण भड आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रस्तविक प्राचार्य संतोष गिरहे यांनी केले. उदघटनीय भाषणात दिलीप हेडा यांनी विज्ञान विषयाचे महत्व सागुन कार्यशाळेला शुभेच्छा दिल्यात. अध्यक्षीय भाषणात शिक्षणाधिकारी राजेन्द शिंदे यांनी विज्ञान शिक्षक आपल्या शाळेत काय काय करू शकतो?विद्यार्थ्यान मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण कसा रुजवावा? विज्ञान शिक्षकांची भूमिका? याबाबत मार्गदर्शन करून विज्ञान शिक्षक हा शाळेचा कणा असतो असे विज्ञान शिक्षकांबद्दल गौरव उदगार काढले.
यानंतर 50 व्या विज्ञान प्रदर्शनीत जिल्हा स्तरावर सहभागी झालेल्या 09 विद्यार्थी व शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.सुरेश केनवडकर व राजेश वाघ यांनी तयार केलेल्या विज्ञान विषयाच्या पुस्तकाचे उपस्थित मान्यवारांच्या हस्ते विमोचन केले.
कार्यशाळा दोन सत्रांत घेण्यात आली. पहिल्या सत्रांत विजय भड यांनी इंस्पायर अवार्ड मानक योजना संबधित संपूर्ण माहिती दिली,तसेच शाळा नोंदणी,विद्यार्थी नोंदणी,वर्षभर राबविन्यात येणाऱ्या विज्ञान उपक्रमा बाबत पीपीटी द्वारे मार्गदर्शन केले. ललित भूरे यांनी एन एन एम एस परीक्षा, एन टी एस,सारथी इत्यादि परिक्षेविषयी मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्राला अध्यक्ष म्हणून भारतीय संशोधक सत्यनारायण भड तर प्रमुख अतिथि म्हणून
विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ, नागपुर सचिव नरेश चाफेकर, सदस्य रोहित गानोरकर, मनिषा घारे उपस्थित होते.यावेळी सत्यनारायण भड यांचा विज्ञान अध्यापक मंडळ द्वारा सत्कार करन्यात आला.
दुसऱ्या सत्रांत नरेश चाफेकर यांनी विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा व इस्त्रोच्या वैज्ञानिक बस याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर भारतीय संशोधक तथा शासकीय तंत्रनिकेतन वाशिमचे चार्जमन सत्यनारायण भड यानी इंस्पायर अवार्ड चे प्रकल्प तयार कसे करावे?, ते करत असताना कोणती काळजी घ्यावी?, कोंनकोनत्या समस्या येऊ शकतात?त्या समस्या कशा सोडवाव्यत? याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या सत्राचे संचालन विजय भड तर आभार मनीष गावंडे यांनी मानले. सदर कार्यशाळेला जिल्ह्यातील बहुसंख्य विज्ञान शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.
आपल्या प्रतिक्रिया द्या....