कारंजा:-जि.प.विद्यालय कामरगाव येथे इको क्लब व स्काऊट गाईड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शाडू माती पासून मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली होती.
शाडू मूर्ती कार्यशाळा उपक्रम प्रमुख म्हणुन इको क्लब चे श्री.गोपाल खाडे,गाईड युनिटच्या दिपाली खोडके यांनी मुख्याध्यापक प्रा.सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात काम पाहले. या कार्यशाळेत जवळपास १०० विद्यार्थी सहभागी झाले.या कार्यशाळेला गणपतीच्या मूर्ती बनवण्यासंदर्भात इको क्लबचे गोपाल खाडे व स्काऊट युनिटचे सतीश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
केंद्राचे केंद्रप्रमुख सै.कलीम सै. नसीर , विषयतज्ञ सचिन घुले निरज खोरदडे यांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी कल्पकतेने विविध रूपात गणरायाला साकारले होते.विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणपूरक सण साजरा करण्याची जाणीव रुजली.प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे होणारे पाणी प्रदूषण, रासायनिक रंगांचे दुष्परिणाम हे त्यांनी समजून घेतले.निसर्गाशी एकरूप राहूनही सण साजरा करता येतो,याचा अनुभव मिळाला.पुढील पिढी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यास प्रेरित झाली.शाडू मातीला आकार देताना विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलते ला वाव मिळाला.छोट्या-छोट्या हातांनी बनवलेली मूर्ती म्हणजे केवळ कला नाही तर श्रद्धा व श्रमाची सांगड आहे,हे विद्यार्थ्यांनी जाणलं. विद्यार्थ्यांनी परंपरा आणि कला एकत्र आणून स्वतःच्या हातांनी गणपती घडवण्याचा आनंद अनुभवला.सामूहिक उपक्रमामुळे सहकार्य, धैर्य आणि आत्मविश्वास यांचे बीज विद्यार्थ्यांमध्ये रुजले.या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांच्या मनात "सण म्हणजे केवळ आनंदोत्सव नव्हे, तर निसर्गाची जपणूक आणि कलेची साधना" हा सुंदर संदेश पेरला गेला.
तयार केलेल्या गणपती मधून वर्ग ५ ते ७ मधून प्रथम ओम धामोरे, द्वितीय वैष्णवी धामोरे तृतीय मिलिंद किर्दक चौथा गौरी शेकोकार पाचवा पूर्वी ठाकरे तर ८ ते १० मधून प्रथम वेदांशी हिंगे,द्वितीय चैताली तुमसरे,तृतीय आरुषी भुजाडे,चवथा मानवी लाडवीकर व पाचवा गौरी राठोड या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावले .
कार्यशाळा यशस्वीतेकरीता गोपाल खाडे, दिपाली खोडके,चंद्रशेखर पिसे,सतीश चव्हाण,नीता तोडकर,भूमिका भाकरे, पुष्पा व्यवहारे,गजानन देशमुख,धनु गारवे शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....