वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित "जाणता राजा"महानाट्याचे थाटात उद्घाटन करण्यात आले.या महानाट्य प्रयोगाला वाशिमकरांसह,कारंजा मानोरा,मंगरूळपिर,रिसोड, मालेगाव,वाशिम ह्या सहाही तालुक्यातील नाटयप्रेमी, विद्यार्थी,महिला पुरुषांनी उदंड प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवीत "न भुतो न भविष्यती"अशी गर्दी दर्शवून सदर महानाट्य वाशिमच्या इतिहासात अप्रतिम कलाकृती असल्याचे जाहीर केले आहे.असे वृत्त आमचे चिकित्सक अभ्यासू जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले.
या उद्घाटनावेळी जिल्ह्याचे पाहुणे ठरलेले सत्ताधारी शिवसेना (शिंदे गटाचे नेते) पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांनी मात्र उद्घाटनाला दांडी मारल्याने जिल्हावासी शिवप्रेमी नागरीकांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त होत असून ना.संजयभाऊ राठोड यांच्या कडून अशी अपेक्षा नसल्याचे बोलले जात आहे. यावेळी झालेल्या राजेशाही थाटातील भव्य उद्घाटनाला जिल्हा परिषदेचे लोकप्रिय अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे, वाशिमचे भाजपा आमदार लखनभैय्या मलिक,जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस,उपमुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे,अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,उपजिल्हाधिकारी कैलास देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या ,त्रिदिवशीय जाणता राजा महानाटय प्रयोगाच्या शुभारंभ उद्घाटनानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली.
या महानाट्य प्रयोगात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंगांचे सादरीकरण करण्यात आले. अलाऊद्दीन खिलजीचे आक्रमण व त्यांचा जुलुम,छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म,बाल राजे शिवाजी,जुलुमी सिंहासनाविरुद्ध शिवाजी महाराजांचा बंड, आई तुळजा भवानीचे गोंधळ्याकडून गायलेले गोंधळीगीत,स्वराज्याची शपथ,युद्ध ते शिवराज्याभिषेकापर्यंत मावळ्यांच्या अतुलनिय पराक्रमाच्या क्षणांचे शिवप्रेमी लोककलावंतांकडून उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले.हा महाप्रयोग याची देही याची डोळा पहाणाऱ्या दर्शकांना आपण इतिहासातील शिवकाळात असून,प्रत्यक्ष शिवरायांना डोळ्यादेखत पहात असल्याची प्रचिती होत होती.
सदर जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या महानाट्य प्रयोगाला पहिल्या दिवशी शनिवार दि 10 फेब्रुवारी 2024 रोजी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी व त्यांचे पालक,शिवप्रेमी, जिल्हाप्रशासनातील जिल्हाधिकारी, जिल्हापरिषद, पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी,कारंजा मानोरा तहसिल अधिकारी कर्मचारी इतर शासकीय निमशासकिय कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक व पत्रकार मंडळी परिवारासह उपस्थित असल्याचे दिसून आल्याचे आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले.सदर महानाट्य, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग संचनालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूर्णपणे विनामुल्य ठेवण्यात आलेले असले तरीही क्रिडासंकुल स्थित नाट्यसभागृहात प्रवेशाकरीता व्हिआयपी पासेस आणि सर्वसाधारण पासेस ठेवण्यात आल्यामुळे चोहीकडे राजकिय नेते कार्यकर्ते मंडळी आणि महत्वाचे म्हणजे शासकीय अधिकारी कर्मचारी यांची व त्यांच्या कुटुंबीयांयाचीच संख्या दिसत होती तर सर्वसामान्य नागरिकांना मात्र पासेस अभावी महानाट्य पहाता आलेले नाही. (त्यामुळे शासनाने,सर्वसामान्य जनतेचा आणि मतदारांचा विचार करून,सर्व नागरीकांसाठी खुल्या मैदानात,आणखी आठ दिवस तरी हे महानाट्य ठेवण्याची मागणी नागरीकां कडून होतांना दिसत आहे.आणखी कालच्या दुसऱ्या दिवसच्या प्रयोगानंतर आज तिसऱ्या दिवशी सदर महानाट्याचा प्रयोग होणार आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....