ब्रम्हपुरी:-
भारतीय जनता पक्षाच्या जडणघडण करण्यात ज्या अनेकांचे योगदान आहे त्यात गोपीनाथजी मुंडे यांचा सिहाचा वाटा आहे.पक्ष वाढीचे,लोककल्याणाचे, भाजपाला बहुजन चेहरा देण्याचे कार्य सदैव प्रेरणा देणारे आहे असे गौरवपूर्ण विचार ब्रम्हपुरी तालुका व शहर भाजपा ओबीसी मोर्चा द्वारा आयोजित स्व गोपीनाथजी मुंडे अभिवादन कार्यक्रम प्रसंगी भाजप कार्यालय येथे प्रा प्रकाश बगमारे,राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा प्रकाश बगमारे यांनी व्यक्त केले
या प्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री व जि प माजी सदस्य संजय गजपुरे यांनी मर्यादित जनतेमध्ये असलेल्या भाजपा ला लोकाभिमुख करण्याचे कार्य गोपीनाथजी यांनी
अत्यंत प्रामाणिक पणे केले यात दुमत नाही असे विवेचन केले.
याप्रसंगी उपस्थित वंजारी समाजाचे नेते निवृत्त कृषी अधिकारी श्री तेलंग साहेब यांनी सुद्धा स्व गोपीनाथ जी मुंडे यांच्या कार्याला उजाळा दिला
भाजपा न प गटनेते तथा शहर महामंत्री मनोज वठे यांनी अनेक उदाहरणे देऊन गोपीनाथ जी कार्यकर्ते सांभाळणारे कसे लोकाभिमुख नेते होते या कार्याला उजाळा दिला
या प्रसंगी वंजारी समाजाचे नेते राजेंद्र हेमके,भाजपा ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष प्रेमलाल धोटे,ब्रम्हपुरी शहर भाजपा ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष प्रा डॉ अशोक सालोडकर,माजी नगरसेवक मनोज भूपाल,भाजयुमो जिल्हा सचिव तनय देशकर,साकेत भाणारकर ,भाजयुमो शहर महामंत्री स्वप्नील अलगदेवें, रितेश दशमवार,राजू भागवत,प्रा संजय लांबे,अशोक तूंडुलवार ,सुरेश बनपूरकर उपस्थित होते
कार्यक्रमाचे संचालन माजी नगरसेवक मनोज भूपाल यांनी तर उपस्थितांचे आभार तनय देशकर यांनी मानले
आपल्या प्रतिक्रिया द्या....