अकोला:- जिल्ह्यात सुमारे अडीच हजार कोटीहून अधिक म्हणजेच 2588 कोटी 55 लाख रुपये च्या निधीच्या विविध 21 विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले सिंचन रस्ते रुग्णालय सुधारणा सांस्कृतिक भवन तरण तलावासह विविध प्रशासकीय इमारती अशा विकास कामांमुळे जिल्ह्यातील विकासाचा प्रवाह गतिमान होणार आहे विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भावनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर खासदार अनुप धोत्रे आमदार रवींद्र चव्हाण आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकळे आमदार वसंत खंडेलवाल आमदार किरण सरनाईक आमदार श्याम खोडे विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंगल पोलीस महानिरीक्षक रामराव पोकळे जिल्हाधिकारी अजित कुंभार पोलीस अधीक्षक अर्जित चांडक आदी मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन अद्यावत व सुसज्ज इमारतीचे लोकार्पण झाले यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वागत कक्ष हिरकणी कक्ष आनंदी कक्ष आहेत यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वागत कक्ष जाहीरपणे कक्ष आनंदी कक्ष आवश्यक दस्ताऐवज मिळण्यासाठी सुविधा आधीचे निरीक्षण केले त्यानंतर नियोजन भावनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाच वेळी ऑनलाईन पद्धतीने विविध विकास कामाचा शुभारंभ झाला अकोला येथील तहसील तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अध्यायवत इमारतीचे तसेच महिला व बाल विकास योजनाचे लोकार्पण झाले पूर्णा नदीवरील काठीपाठी बेरीज प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले सुमारे 454.62 कोटी रुपयांच्या निधीतून सिंचन व्यवस्था निर्माण होऊन शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी संशोधन वारसा असलेल्या अकोला भूमीत २४९.४१ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे इमारतीचा कोण शीला समारंभ ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाला अकोला शहरात अमृत 2.0 योजनेत 629. 6 कोटी रुपये निधीतून मल निसारण टप्पा एक चे काम तसेच शहरासाठी 18.99 कोटी रुपये निधीतून पंतप्रधान ई बस सेवा योजनेत ही बस डेपो व चार्जिंग स्टेशनचे भूमिपूजन झाले त्याचप्रमाणे पंधरा कोटी रुपये निधीतून अद्यावत संस्कृतिक भवन सुमारे 9.96 कोटी रुपयांनी जिथून ऑलम्पिक दर्जाचा तरण तलावाचा कोण शीला समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला हायब्रीड एनुईटी अंतर्गत मूर्तिजापुर दहिगाव गुरुजी उमरी अकोला राज्य महामार्ग 284 तसेच अकोला मलकापूर कानशिवनी मोरगाव काकड बोरगाव खुर्द जिल्हाप्रमुख मार्गाची सुधारणा 410.10 कोटी रुपये निधीतून होणार आहे त्याचे भूमीपूजन यावेळी झाले त्याचप्रमाणे उकळी बाजार नेहर नानखेड किनखेड राज्य महामार्ग 278 किमखेड दहीहंडा महामार्गाची सुधारणा अकोट मतदार संघातील राज्य मार्ग क्रमांक 47 रावेर पातुर्डा पिंपळगाव खांडवी जळगाव जामोद हिवरखेड अकोट या महामार्गावर मार्गावरील हिवरखेड ते वरखेड भाग सुधारणा 311.44 कोटी निधीतून होत आहे बार्शी टाकळी शहरात 9.99 कोटी रुपये निधीतून मुख्य रस्ता होत आहे या कामाचे भूमिपूजन झाले सर्वोच्च रुग्णालयात 151.56 कोटी रुपये निधीतून नवीन वाढ इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे यामुळे रुग्णांसाठी सुविधा निर्माण होऊन होणार असून त्याची भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले अकोला येथे 129.23 कोटी निधीतून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दक्षता नगर येथे 286 निवासस्थाने व परिसर विकास कामामुळे कर्तव्यप्राप्ती 24 तास बांधील असणाऱ्या पोलिसांसाठी निवासाची सोय निर्माण होणार आहे तसेच पाच कोटी खर्चाची अकोला तालुका क्रीडा संकुल या कामाचे कोनशीला अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला मुर्तीजापुर तालुक्यातील हिवरखेड हिवरा कोरडे तसेच पारद येथे 33 11 केव्ही उपकेंद्राची भूमी पूजन व बार्शीटाकळी तालुक्यातील भेंडी महाल येथे 45 कोटीच्या दहा मेगावात क्षमतेच्या वरील वा गाव येथे नऊ कोटीच्या दोन मेगाव्यात क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते झाले अकोला जिल्ह्यातील अकोला व अकोट या दोन शहरांमध्ये नऊ कोटी रुपये निधीतून सीसीटीव्ही प्रकल्पाचे लोकार्पणही झाले यावेळी झाले प्रारंभी पालकमंत्री ते राज्य कामगार मंत्री एडवोकेट आकाशकुरकर आणि जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी मेळघाटातील प्रतिकृती भेट देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले या कार्यक्रमात विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्र्यांचे अकोला विमानतळ येथे आगमन आगमन प्रसंगी पालकमंत्री ऍडव्होकेट फुंडकर खासदार अनुप धोत्रे आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल आमदार किरण सरनाईक माजी राज्यमंत्री डॉक्टर रणजीत पाटील जिल्हाधिकारी अजित कुंभार आदींनी स्वागत केले