परभणी शहरातील परसावत नगर येथील श्री छत्रपती शाहू विद्यालय येथे आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात 78 वा स्वतंत्रता दिवस साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्यात आले. दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतंत्रता सेनानी यांच्या प्रमुख भूमिका निभावल्या व तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांनी मुलांनी सर्वांची मने जिंकली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालंकार शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा गोपिराज काळे नागरी सहकारी पतसंस्थाचे अध्यक्ष सुभाष काळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख, राज्य संघटक तथा संपर्क प्रसिध्दी प्रमुख भगीरथ बद्दर, लोक स्वातंत्र्य सामाजिक सेवा संघाचे अकोला जिल्हाध्यक्ष संजय कृ. देशमुख, अकोला जिल्हा मार्गदर्शन पदाधिकारी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ कृष्णराव देशमुख, जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. छाया गरुड, सुरेश रनेर सर आदींसमवेत शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.