कारंजा (लाड) : राजकिय, शैक्षणिक,धार्मिक,आध्यात्मिक, सामाजिक,सहकार क्षेत्रातील दिग्गज सहकार नेते असलेले सुनिल पाटील धाबेकर यांचा कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाशी जवळचा संबंध आहे.गेल्या पाच ते दहा वर्षा पासून तर त्यांनी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाची कर्मभूमी म्हणून निवड करून, हल्ली ते स्थानिक राजकारणातही सक्रिय झाले असल्याने,ग्रामिण भागातील अनेक पंचायत समिती सदस्य,ग्राम पंचायतीचे सरपंच व सदस्य तसेच स्थानिक नगर पालिकेचे माजी नगरसेवक त्यांच्या सोबत आहेत.त्यामुळे त्यांच्या सर्वधर्मिय कार्यकर्त्याचा व मित्रमंडळींचा फार मोठा जनसमुदाय त्यांचे सोबत आहे. व त्यांनीच यापुढे कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढवावी तसेच कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचा आढावा घेऊन महाविकास आघाडीने त्यांना उमेद्वारी जाहीर करावी अशी मागणी अरविंद लाठीया,प्रदिप वानखडे,संजय कडोळे, अब्दुल राजिक शेख, जान मोहम्मद पठान,शेरखाँ पठान इत्यांदीनी केली आहे.सध्या कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात सुनिल पाटील धाबेकर हे घाटोळे,कुणबी, मराठा समाजाचे यशस्वीपणे नेतृत्व करतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये त्यांच्या नेतृत्वातच घाटोळे,कुणबी, मराठा समाजाने त्यांच्या म्हणण्या प्रमाणे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेद्वार खासदार संजय देशमुख यांना भरभरून मते दिलेली होती.शिवाय सुनिल धाबेकर यांच्या मार्गदर्शनामुळेच दिवंगत माजी आमदार स्व. बाबासाहेब धाबेकर मित्र मंडळाच्या सर्वधर्मिय कार्यकर्ते,बंजारा,बहुजन,मुस्लिम व गवळी समाजाच्या कार्यकर्ते बांधवांनी देखील जास्तित जास्त मतांनी खासदार संजय देशमुख यांना भरघोस मतांचे मताधिक्य देवून निवडून दिले होते.खा. संजय देशमुख यांच्या विजयामुळे महाविकास आघाडी मध्ये सुनिल पाटील धाबेकर यांचे महत्व वाढल्याचे सुद्धा दिसून येत असून,महाविकास आघाडीच्या घटक पक्षाची काँग्रेस किंवा उबाठाची उमेद्वारी सुनिल पाटील धाबेकर यांना मिळवून देण्यात खासदार संजय देशमुख हे देखील महत्वाची भूमिका बजावू शकतील असा येथील कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे नुकतेच कार्यकर्त्यांनी सुनिल पाटील धाबेकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्याचा आग्रह धरून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्याचे प्रदिप वानखडे यांनी ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवीले आहे.