वाशीम : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील राज्यातील सर्व शासकीय / खाजगी
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया २०२४ ३ जून पासुन सुरु
ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज भरावेत. सदर अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० जुन २०२४ सायंकाळी ५
वाजेपर्यत आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठीची प्रवेश प्रक्रियेसंबंधीची व प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती
पुस्तीका Online स्वरुपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात
आली आहे. अर्ज स्विकृती, विकल्प सादर करणे, व प्रवेश प्रक्रियेचे विविध टप्पे इ. प्रक्रिये बाबत समुपदेशन सर्व
औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये दररोज आयोजित करण्यात येत आहे. माहितीपुस्तिकेत नमुद असलेल्या
टप्प्याप्रमाणेच प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार असुन त्यासंदर्भातील वेळापत्रक तसेच राज्यातील शासकीय व
अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपलब्ध असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमाची माहिती व्यवसाय शिक्षण व
प्रादेशिक कार्यालय, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय वाशिम व सर्व शासकीय व
खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अर्ज स्विकृती केंद्रात मुळ कागदपत्रे तपासणीनंतर १ जूलै २०२४ रोजीच्या सायं ५ वाजेपर्यंत प्रवेश अर्ज निश्चित करावे.असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण
अधिकारी प्रकाश जयस्वाल यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....