कारंजा : आपल्या देश, राज्य, गाव, समाज यालाच आन-बान-शान समजून, प्रखर हिंदुत्वाकरीता सर्वस्व वाहिलेल्या गणेशराव बाबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या वतीने, माजी नगरसेवक नितीनजी गढवाले यांच्या अध्यक्षते खाली, कोरोनो अर्थसहाय्य जिल्हा निवड समिती अशासकिय सदस्य तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांनी, भगवी शाल व पुष्पगुच्छ देऊन, शिवसेना कारंजा शहर प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेशराव बाबरे यांचा भव्य सत्कार केला. यावेळी शिवसेना कार्यालयात अ भा मराठी नाटय परिषद नियामक मंडळ मुंबईचे लोकनियुक्त सदस्य नंदकिशोर कव्हळकर, कैकाडी महासंघाचे विदर्भ सचिव पांडूरंग माने, मराठा पाटील समाज संघटनेने शेषराव पाटील इंगोले, श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरीचे विजय पाटील खंडार उपस्थित होते. यावेळी बोलतांना गणेशराव बाबरे म्हणाले की,"कारंजा तालुक्यातील शिवसेना खंबीर असून, हिंदुत्वाच्या स्वाभिमाना करीता, आगामी नगर परिषद निवडणुकीत आपले शिवसैनिक, कारंजा शहराच्या विकासाकरीता, प्रत्येक वार्डावार्डातून निवडणूक लढवतील आणि येथील शिवसैनिक प्रखर आत्मविश्वासाने, शिवसेना पक्षप्रमुख माननिय उद्धरावजी ठाकरे यांच्या सोबत असून त्यांचे आशिर्वाद घेण्याकरीताच मी आज मुंबईकडे मातोश्रीवर रवाना होत आहे."