वाशिम : महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने प्रत्येक वर्षी १८ वर्षापेक्षा कमी बालकांना शौर्य, विज्ञान, पर्यावरण, कला, नाविन्यपुर्ण शोध या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या बालकांना
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या वतीने सन्मानित करण्यात येते.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार २०२५ करीता ३१ जुलै २०२४ पर्यंत https://awards.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वाशिम यांनी कळविले आहे.