कारंजा (लाड) : कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील, महाविकास आघाडीच्या उमेद्वाराबाबत,महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेशी बोलतांना,राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कारंजा तालुक्याचे तालुकाध्यक्ष मनोज पाटील कानकिरड यांनी सांगीतले की, "महाविकास आघाडीमध्ये घटक पक्षाशी आमची निवडणूक आघाडी असून,कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडी मध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वाट्याला आलेला आहे.त्यामुळे निवडणूक रिंगणामध्ये आमच्याच पक्षाचा उमेद्वार असणार आहे.त्यानुसार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननिय शरदचंद्रजी पवार साहेब,आघाडीचे पक्षश्रेष्ठी आणि शिर्षस्थ नेते उमेद्वाराबाबत जो निर्णय घेतील.त्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा तालुका अध्यक्ष या नात्याने मी,माझे पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही सर्व मिळून महाविकास आघाडी जो उमेद्वार देईल.त्या आमच्या उमेद्वाराच्या पाठीशी खंबीरपणे राहून आमच्या उमेद्वाराला जास्तित जास्त मताधिक्याने निवडून आणण्याकरीता पक्षाच्या आदेशाने,प्रयत्न करणार आहे." तसेच सध्या सर्वत्र महाविकास आघाडीचे वारे असून निश्चितपणे आमच्याच पक्षाचा विजय होणार असल्यामुळे आम्ही महाविकास आघाडीकडून जो उमेद्वार दिला जाईल त्या उमेद्वारा सोबत असल्याची ग्वाही देत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष मनोज पाटील कानकिरड यांनी सांगीतले आहे.