कारंजा [जिल्हा प्रतिनिधी] नाथ योगगुरू सिद्ध शांतीनाथ महाराज यांच्या रामगाव (रामेश्वर) परिसरातील आश्रमात,सिद्ध शांतीनाथ महाराज यांच्या अनुयायी शिष्य मंडळी व भाविक भक्तांकडून व्यसनमुक्ती सम्राट राष्ट्रिय किर्तनकार हभप मधुकर महाराज खोडे यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत,सिद्ध योगगुरू शांतीनाथ महाराज यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा आयोजीत करण्यात आला होता.याप्रसंगी नाथसंप्रदायी संतमंडळीची उपस्थिती होती.याप्रसंगी इतर शिष्यमंडळीसह भाविकांनी शांतीनाथ महाराजांचे चरणस्पर्श करीत त्यांचा सत्कार केला.तसेच वैदर्भिय नाथ समाज संघटनेच्या वतीने संस्थापकिय अध्यक्ष एकनाथ पवार यांनी शाल,श्रीफळ,पुष्पहार व नाथसंप्रदायाचे आदीगुरू गोरक्षनाथ महाराज यांची प्रतिमा देऊन महाराजांचे अभिष्टचिंतनानिमित्त दर्शन व सत्कार केला.यावेळी महाराष्ट्र गोंधळी समाज संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष तथा संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे कारंजा तालुका सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय कडोळे यांनी सुद्धा महाराजांचे दर्शन घेवून दिर्घायुष्याची प्रार्थना केली. महाराजांनी आपल्या प्रवचनातून शिष्यमंडळीना गुरु हे परमेश्वर आणि भाविकांमधील दुवा असून, गुरुभक्ती ही श्रेष्ठभक्ती असल्याचे म्हणत उपस्थितांना गुरुभक्तीचा मंत्र दिला. कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री हभप गुलाबरावजी गावंडे,अकोला वाशिम मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील कानकिरड, पंचक्रोशीतील भाविकांमध्ये माजी आमदार स्व.डहाके परिवाराची मंडळी,आमदार राजेंद्रजी पाटणी यांचे स्विय सहाय्यक संजय भेंडे, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. राजीव काळे,राजीव भेंडे,कार्यकर्ते संकेत नाखले इत्यादी तसेच पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा,विदर्भातील शिष्यांसह यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील अनुयायांची लक्षणीय उपस्थिती होती.